‘मेटा’, ‘ट्विटर’, ‘स्नॅप’, ‘मायक्रोसॉफ्ट’, विप्रो सारख्या दिग्गज कंपन्यांनी याआधीच आपली कर्मचारी कपात केली आहे. त्यानंतर ‘अॅमेझॉन’ने दहा हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्याचे ठरवल्याचे वृत्त आहे. करोनानंतर अपेक्षित वृद्धीदर तेवढ्या वेगात न गाठल्याने या बड्या समाजमाध्यम, माहिती-तंत्रज्ञान, ई-वाणिज्य कंपन्या अडचणीत आल्या आहेत. मंदीची चर्चा सुरू असताना या कंपन्या खर्च कमी करत आहेत. दरम्यान, हे टाळेबंदीचे वारे आता ‘आयटी’नंतर ‘ऑटो’ सेक्टरमध्येही शिरल्याचे दिसत आहे. कारण, अमेरिकेतील कार निर्मिती क्षेत्रातील नामांकीत असणाऱ्या फोर्ड कंपनीने युरोपमध्ये तीन हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
फोर्ड कंपनीने युरोपमधून ३ हजार २०० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचे ठरवले आहे. एवढेच नाहीतर कंपनीने काही प्रोजेक्ट युरोपमधून अमेरिकेत स्थलांतरित करण्याचाही निर्णय घेतला आहे.
यासंदर्भात रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, कंपनी विकास कामातील अडीच हजार नोकऱ्या आणि प्रशासकीय कामातील ७०० नोकऱ्या काढू इच्छित आहे. फोर्ड कंपनीच्या या निर्णयाचा सर्वाधिक फटका जर्मनीतील लोकांना बसणार आहे. फोर्ड कंपनी युरोपमध्ये जवळपास ४५ हजार लोकांना रोजगार देते.
बड्या ‘टेक’ कंपन्या इतकी घाऊक कर्मचारी कपात करतात, हे लक्षण कशाचं?
GoMechanic नं केली ७० टक्के कर्मचारी कपातीची घोषणा –
गेल्या काही दिवसांपासून अनेक बड्या कंपन्यांमधून कर्मचारी कपातीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यामध्ये थेट गुगलपासून अॅमेझॉनपर्यंत अनेक आयटी कंपन्यांचाही समावेश आहे. त्यातच या वर्षी जून महिन्यात मंदी येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर ऑटोमोबाईल सर्विसिंगची सेवा पुरवणाऱ्या GoMechanic या स्टार्टअपनं तब्बल ७० टक्के कर्मचारी कपात करणार असल्याचं जाहीर केलं आहे. यासाठी त्यांनी कंपनीची धोरणं आणि चुकीचे आर्थिक अंदाज जबाबदार असल्याचं म्हटलं आहे.