Tips To Boost Bike Mileage : शहर असो किंवा गाव बहुतांश घरात किमान एक तरी बाइक असतेच. रोजच्या प्रवासासाठी बाइकला प्राधान्य दिले जाते. पण बाइक वापरणाऱ्यांना दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या पेट्रोलच्या दराची चिंता सतावते. अशात बाइकचे मायलेज कमी झाले तर खर्च आणखी वाढू शकतो. यावरील उपाय म्हणजे काही सोप्या टिप्स वापरुन तुम्ही बाइकचे मायलेज वाढवू शकता.
बाइकचे मायलेज वाढवण्यासाठीच्या सोप्या टिप्स
टायरमधील हवेचे प्रेशर नीट आहे का तपासा
बाईकचे टायर प्रवासादरम्यान महत्त्वाची भूमिका बजावतात, त्यामुळे टायरमधील हवेचे प्रेशर तपासत राहा. यासह नेहमी टायर वेळेवर बदला, कारण जीर्ण झालेल्या टायरचा मायलेजवरही परिणाम होतो.
बाइकची नीट देखभाल करणे आवश्यक आहे
मायलेज कमी होऊ नये यासाठी बाइकची नीट देखभाल (मेंटेनन्स)करण्याचा सल्ला तज्ञ देतात. नीट देखभाल न केल्यास इंजिन व्यवस्थित काम करणार नाही. याबरोबरच बाइकचा एअर फिल्टर नेहमी स्वच्छ ठेवा. तसेच बाईकच्या स्पार्क प्लगला आवश्यक करंट मिळत आहे का आणि ते कार्बन फ्री आहे हे देखील सतत तपासावे.
आणखी वाचा : २० लाखांपेक्षा कमी किंमतीत मिळणाऱ्या पाच आकर्षक कार लवकरच होणार लाँच; पाहा यादी
बाइकवर अतिरिक्त वजन टाकू नका
बाइकवर जास्त वजन टाकल्याने इंजिनची काम करण्याची क्षमता वाढेल. परिणामी बाइकचा वेग वाढवण्यासाठी जास्त पेट्रोलची गरज भासेल. अशा परिस्थितीत, जर तुम्ही सतत बाईकवर अतिरिक्त वजन टाकले तर ते बाईकच्या इकॉनॉमी फिगरला बिघडवेल.
बाइक नेहमी स्वच्छ ठेवा
तुमची बाईक स्वच्छ ठेवणे नेहमीच आवश्यक असते. जर तुमची बाईक स्वच्छ ठेवली तर ती तिच्या वेगात कोणतीही अडचण येणार नाही आणि तसेच ती सतत रस्त्यावरील उडणाऱ्या चिखलाने गंजणार नाही.
चेन आणि इंजिनमध्ये तेल घालत रहा
तुमच्या बाइकच्या चांगल्या मायलेजसाठी चेन, इंजिन आणि बाइकच्या इतर पार्ट्समध्ये आवश्यक तिथे सतत तेल घालत रहा. तसेच जर तुमच्या बाइकला डिस्क ब्रेक्स असतील, तर इंजिन ऑइल, कूलिंग फ्लुइड आणि ब्रेक ऑइलची यांची पातळी मेंटेन ठेवा.
आणखी वाचा : ७० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळत आहेत ‘या’ आकर्षक स्कूटर; पाहा यादी
गरज असेल तेव्हाच क्लच वापरा
अनेकांना क्लच आणि ब्रेकवर हात ठेवून गाडी चालवण्याची सवय असते. तर काही जण मागील ब्रेक पॅडलवर उजवा पाय ठेवून बाइक चालवतात. असे करणे चुकीचे नाही, पण यामुळे गरज नसतानाही क्लच आणि ब्रेक वापरण्याची सवय लागते. बाइकचे मायलेज वाढवण्यासाठी क्लचचा अनावश्यक वापर टाळावा.