पावसाळ्याच्या दिवसांमध्ये स्वतःच्या तब्बेतीबरोबर इतर अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. त्यातीलच एक गोष्ट म्हणजे कार. मुबंईसारख्या दाटवस्ती असणाऱ्या शहरांमध्ये बऱ्याच वेळा पार्किंगची सुविधा उपलब्ध नसते. मग अशावेळी कार बाहेर पार्क केल्यानंतर पावसात भिजून खराब होण्याची शक्यता असते. अशावेळी कारची नीट काळजी घेतली नाही, तर कारला गंज लागण्याची तसेच कार खराब होण्याची शक्यता असते. यासाठी आधीच कारची देखभाल केली तर दुरुस्तीसाठी येणारा खर्चही वाचेल.
पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी साचते, विशेषतः शहरी भागात ठिकठिकाणी पाणी साचते. अशा साचलेल्या पाण्यात कार पार्क केली असेल किंवा कार सतत भिजत असेल तर त्यामुळे कारला गंज लागण्याची किंवा कार खराब होण्याची शक्यता असते. अशावेळी कोणत्या टिप्स वापरुन तुम्ही कारची काळजी घेऊ शकता जाणून घ्या.
आणखी वाचा : नवीन कार घेण्याचा विचार करताय? मारुती सुझुकीच्या ‘या’ तीन गाड्यांची होतेय सर्वाधिक विक्री; जाणून घ्या फीचर्स
चिखल साफ करा
पावसाळ्यात कार चालवल्यानंतर त्याला चिखल लागणे साहजिक आहे. पण हा चिखल जर साफ केला नाही तर त्यामुळे कारला गंज लागु शकतो. त्यामुळे पावसाळ्यात सतत कारच्या चाकांवर किंवा इतर पार्ट्सवर लागणारा चिखल साफ करण्याची गरज असते.
पावसात कारला कव्हरने झाकू नका
पावसाच्या पाण्यापासून आणि धुळीपासून वाचवण्यासाठी बरेचजण गाडीला झाकून ठेवतात, यामुळे गाडी स्वच्छ राहील असा विचार केला जातो. परंतु पावसाळ्यात असे केल्यास गाडीचे नुकसान होऊ शकते. कारण पावसात कव्हरमध्ये ओलावा निर्माण होतो, ज्यामुळे कार गंजण्याचा धोका वाढतो. त्यामुळे पावसात उभ्या असलेल्या कारला कव्हरने झाकणे टाळावे.
आणखी वाचा : मद्यपान करून गाडी चालवल्यास वाजणार अलार्म; लवकरच येणार नवी सिस्टम
कारला पॉलिश करा
पॉलिशिंगमुळे कारच्या पेंटवर एक विशेष थर तयार होतो. याचा फायदा असा होतो की पाणी जास्त वेळ गाडीवर न राहता सरळ खाली पडते. अशा प्रकारे कार गंजण्यापासून वाचवता येऊ शकते.