टू व्हीलर सेक्टरच्या बाईक सेगमेंटमध्ये कमी किमतीच्या बाईक्सची मोठी रेंज आहे, ज्यांची किंमत ५२ हजार रुपयांपासून सुरू होते. या कमी बजेट बाईक्सच्या सध्याच्या रेंजमध्ये आम्ही हिरो एचएफ डिलक्सबद्दल बोलत आहोत ज्याला कमी किंमत, कमी वजन आणि मायलेजसाठी प्राधान्य दिलं जातं.

Hero HF Deluxe ची बेस मॉडेलची एक्स-शोरूम किंमत ५९,८९० रूपये आहे जी त्याच्या टॉप व्हेरियंटमध्ये ६२,५२० रूपयांपर्यंत जाते. जर तुम्हाला ही बाईक घ्यायची असेल, पण तुमचे बजेट कमी असेल तर तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय म्हणजे सेकंड हँड बाईक.

Petrol Diesel Price Changes
Petrol Diesel Price Changes : पेट्रोल-डिझेलच्या दरात घसरण? वाचा किती रुपयांनी कमी झाला इंधनाचा दर
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Snack materials became expensive, Snack,
फराळाचे साहित्य महागले
Diwali Jugaad Video how to clean diya in Diwali 2024 kitchen tips in marathi
गॅसवर दिवा ठेवताच कमाल झाली; दिवाळीआधी पणतीचा ‘हा’ VIDEO जरूर पाहा, दिवाळीत होईल मोठा फायदा
TVS Raider iGO variant launched know its features price mileage and ride modes
बजाज पल्सरला टक्कर द्यायला आली ‘TVS’ची ही बाईक, जास्त मायलेजसह मिळतील खास फिचर्स
Diwali Discount On Aprilia Bike
Diwali Discount On Aprilia Bike : झिरो डाउन पेमेंट, तीन वर्षांची वॉरंटी आणि बरंच काही… दिवाळीत ही खास बाईक खरेदी करण्याची तुमच्याकडे संधी
Gold will cross the mark of 85 thousand in Diwali
दिवाळीत सोने ८५ हजारांचा टप्पा ओलांडणार! आजचे दर बघून ग्राहकांमध्ये…
buffalo Viral Video
‘भावा, कर्म तुला सोडणार नाही…’ तरुणांनी म्हशींबरोबर घेतला पंगा, पुढे जे घडलं… VIDEO पाहून व्हाल शॉक

सेकंड हँड Hero HF Deluxe खरेदी करण्यासाठी, तुम्ही या ऑफरचे डिटेल्स येथे वाचू शकता. यामध्ये तुम्हाला ही बाईक अर्ध्यापेक्षा कमी किमतीत मिळू शकते. पण त्या ऑफर्स जाणून घेण्यापूर्वी तुम्ही या बाईकची संपूर्ण माहिती जाणून घेतली पाहिजे.

Hero HF Deluxe मध्ये ९७.२ cc सिंगल सिलेंडर इंजिन आहे. हे इंजिन ८.०२ PS ची कमाल पॉवर आणि ८.०५ Nm चा पीक टॉर्क जनरेट करते आणि हे इंजिन ४ स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.

आणखी वाचा : ६,०८३ रूपयांच्या EMI सह घरी आणा KTM RC 125, मिळेल ४६ किमीपर्यंतचं मायलेज

कंपनीचा दावा आहे की, या Hero HF Deluxe चे मायलेज ८३ kmpl आहे आणि हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे.

बाईकचे इंजिन आणि मायलेजचे तपशील जाणून घेतल्यानंतर, कमीत कमी बजेटमध्ये या बाईकवर तुम्हाला कुठे आणि कोणत्या किमतीत चांगले पर्याय मिळत आहेत हे तुम्हाला कळेल.

Hero HF Deluxe चे २०१४ चे मॉडेल OLX वेबसाइटवर विक्रीसाठी लीस्ट केले गेले आहे. ही बाईक दिल्ली क्रमांकावर नोंदणीकृत असून ती १७ हजार किलोमीटर धावली आहे. या बाईकसाठी किंमत १८ हजार रुपये ठेवण्यात आली आहे.

दुसरी ऑफर बाईकच्या २०१५ च्या मॉडेलवर आहे जी QUIKR वेबसाईटवर लीस्ट केली आहे. या बाईकची नोंदणी दिल्लीतून झाली असून ती आतापर्यंत १८ हजार किलोमीटर धावली आहे. जर तुम्ही ही बाईक घेतली तर तुम्हाला २० हजार रुपये द्यावे लागतील.

आणखी वाचा : केवळ १५ हजारात मिळतेय Hero Super Splendor, जाणून घ्या ऑफर

आजची तिसरी ऑफर BIKEDEKHO वेबसाइटवरून घेतली आहे. येथे Hero HF Deluxe चे २०१६ चे मॉडेल विक्रीसाठी पोस्ट केले आहे. या बाईकची नोंदणी हरियाणाची असून ती आतापर्यंत १९ हजार किलोमीटर धावली आहे. ही बाईक घेण्यासाठी तुम्हाला २२ हजार रुपये मोजावे लागतील.

(महत्त्वाची माहिती: येथे नमूद केलेल्या Hero HF Deluxe च्या या तीन ऑफर्स वाचल्यानंतर, बाईक खरेदी करण्यापूर्वी बाईकचे पेपर आणि कंडिशन नीट तपासून घ्या. अन्यथा तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते.)