Valentine’s Day Special Flipkart Offer : टीव्हीएस मोटर (TVS Motor) ही जानेवारी २०२५ मध्ये दुसरी सर्वाधिक विक्री होणारी इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी होती. आयक्यूब (iQube) कंपनीसाठी हे मोठे यश आहे आणि या दुचाकीसाठी ग्राहकसुद्धा सतत मागणी करत आहेत. आता ई-कॉमर्स दिग्गज फ्लिपकार्ट ८६ हजार ४९९ रुपयांपासून सुरू होणारी इलेक्ट्रिक स्कूटर एका खास ऑफरसह विकण्याच्या तयारीत आहेत. तुम्ही कसा घेऊ शकता या ऑफरचा लाभ चला जाणून घेऊया…
टीव्हीएसची दुचाकी खरेदी करण्यासाठी सर्वोत्तम वेळ –
फ्लिपकार्ट iQube खरेदी करण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मनुसार, iQube ची किंमत १,०७, २९९ रुपये एक्स-शोरूम आहे. काही परम्युशन आणि कॉम्बिनेशनसह (permutations and combinations) फ्लिपकार्ट चार हजार रुपयांची सवलत देत आहे आणि यामुळे दुचाकीची किंमत १,०३,२९९ रुपयांपर्यंत खाली येईल.
तसेच आता ३० हजार रुपयांच्या उत्पादनांवर १२ हजार ३०० रुपयांची मोठी सवलत मिळणार आहे. क्रेडिट कार्डवर सहा हजार रुपयांपर्यंत सवलत आणि सहा हजार रुपयांपर्यंतची बचत देणाऱ्या ईएमआय योजनांचा लाभ घेऊ शकता. या सर्व ऑफर एकत्र करून, आयक्यूब २.२ केडब्ल्यूएच (2.2 kWh) तुमच्यासाठी ८६,४४९ रुपयांमध्ये मिळू शकते.
आयक्यूब २.२ केडब्ल्यूएच स्पेसिफिकेशन –
एंट्री-लेव्हल आयक्यूब २.२ केडब्ल्यूएच ४ बीएचपी आणि ३३ एनएम टॉर्क जनरेट करते. टीव्हीएस मोटरच्या मते, इलेक्ट्रिक स्कूटरचा टॉप स्पीड ७५ kmph आहे आणि Eco वर ७५ किमीची राइडिंग रेंज आणि ६९ किमी पॉवर मोड आहे. बॅटरी २ तास ४५ मिनिटांत ० ते ८० टक्क्यांपर्यंत चार्ज होते. ते ४.२ सेकंदात ० ४० किमी प्रतितास वेग वाढवते. TVS iQube मध्ये ऑटोमॅटिक डे/नाईट मोडसह पाच इंचाचा टीएफटी डिजिटल क्लस्टर आहे आणि नंबर प्लेटसह संपूर्ण एलईडी लाइटिंगसह सुसज्ज आहे. हार्डवेअरच्या बाबतीत, ब्रेकिंग सिस्टममध्ये २२० मिमी फ्रंट डिस्क आणि १३० मिमी मागील ड्रम समाविष्ट आहे, तर स्कूटर १५७ मिमी ग्राउंड क्लीयरन्स आणि ७७० मिमी सीटची उंची आहे.