Best Selling Mahindra cars: देशातली चौथी सर्वात मोठी वाहन निर्माती कंपनी महिंद्रा आणि महिंद्राच्या गाड्यांना सर्वाधिक पसंती मिळत असते. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनने (FADA) जारी केलेल्या फेब्रुवारी २०२३ च्या महिन्यातील वाहन विक्रीच्या आकडेवारीनुसार, महिंद्राने वर्षभरातील विक्री वाढीच्या बाबतीत मारुती, ह्युंदाई आणि टाटा यांना मागे टाकले आहे.

फेब्रुवारी २०२३ मध्ये, मारुती सुझुकीने ८ टक्के वाढ (वार्षिक) गाठली आणि एकूण १,१८,८९२ कार विकल्या. तर, ह्युंदाईने १ टक्के वाढ साधली आणि ३९,१०६ कार विकल्या. या व्यतिरिक्त, टाटा मोटर्सने ३८,९६५ युनिट्सच्या विक्रीसह १४ टक्के वार्षिक वाढ नोंदवली, तर महिंद्राने (फेब्रुवारी २०२२ च्या तुलनेत फेब्रुवारी २०२३ मध्ये) वार्षिक ६० टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली. महिंद्राने गेल्या महिन्यात एकूण २९,३५६ कार विकल्या आहेत तर फेब्रुवारी २०२२ मध्ये १८,२६४ कार विकल्या आहेत.

Toyota has launched the special edition versions For year end
Toyota Year End Deals : टोयोटाच्या तीन गाड्यांचे लिमिटेड एडिशन लाँच; कारच्या खरेदीवर मिळणार भरपूर अ‍ॅक्सेसरीज
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
passengers in E-Shivneri, E-Shivneri,
ई-शिवनेरीमध्ये अनधिकृतपणे प्रवासी बसवले
New Maruti Suzuki Dzire cheapest model price its features Engine and design
New Maruti Suzuki Dzire: मारुतीच्या नवीन डिझायरला मोठी पसंती, सगळ्यात स्वस्त मॉडेल घेण्यासाठी ग्राहकांची लागली रांग
Mumbai Vehicle Number Purchase, Vehicle Number,
मुंबई : पसंतीच्या वाहन क्रमांकांची खरेदी कमी; महसूल जास्त, दोन महिन्यांत १० कोटी रुपयांचा महसूल
2024 Maruti Suzuki Dzire Launch Live Updates: Prices start at Rs 6.79 lakh, to rival Honda Amaze
५ स्टार सेफ्टी रेटिंग, जबरदस्त मायलेज आणि आकर्षक लूकसह नवीन मारुती जनरेशन Dzire 2024 लाँच; पाहा किंमत
Suraj Chavan KGF Bike
“ही गाडी म्हणजे माझी लक्ष्मी…”, सूरज चव्हाणकडे आहे खास KGF Bike! कोणी दिलीये भेट? म्हणाला…

‘या’ दोन गाड्यांनी बदलले नशीब!

  • बोलेरो आणि स्कॉर्पिओ या दीर्घ काळापासून महिंद्रासाठी सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार असल्याचे सिद्ध झाले आहे. वर्षानुवर्षे ते ग्राहकांच्या मनावर राज्य करत आहे. गेल्या वर्षी, कंपनीने स्कॉर्पिओ देखील अपडेट केली आहे, ज्याला स्कॉर्पिओ क्लासिक असे नाव देण्यात आले आहे. याशिवाय स्कॉर्पिओ-एन नावाचे नवीन मॉडेलही लाँच करण्यात आले आहे. दोघांची बुकिंग करण्यात आली आहे. ज्यांना टोयोटा फॉर्च्युनर विकत घ्यायचे होते परंतु कमी बजेटमुळे ते करू शकले नाहीत त्यांच्यासाठी स्कॉर्पिओ-एन देखील आवडते बनले आहे. Scorpio-N ची सुरुवातीची किंमत १२.७४ लाख रुपये आहे.

(हे ही वाचा : खिशाला झळ! Hero चा ग्राहकांना मोठा झटका, ‘या’ तारखेपासून महाग होणार कंपनीच्या Two-Wheeler )

  • महिंद्रा स्कॉर्पिओ-एन बाजारात टोयोटा फॉर्च्युनर सारख्या मध्यम आकाराच्या SUV ते पूर्ण आकाराच्या SUV ला लक्ष्य करते. Scorpio-N ला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. त्यासाठी बुकिंग सुरू होताच पहिल्या अर्ध्या तासात कंपनीला एक लाख बुकिंग झाले. कंपनीचे म्हणणे आहे की, नवीन Scorpio-N चा जुन्या Scorpio शी काहीही संबंध नाही, हे पूर्णपणे नवीन उत्पादन आहे. लाँच केल्यानंतरच महिंद्राने जुनी स्कॉर्पिओ स्कॉर्पिओ क्लासिक या नावाने अपडेट करून लाँच केली.