ह्युंदाई मोटर्स एक लोकप्रिय वाहन उत्पादक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी कायम नवनवीन मॉडेल्स लॉन्च करत असते. आता पुढील काही दिवस हे सणासुदीचे दिवस आहेत. सणासुदीच्या काळामध्ये अनेक वाहन कंपन्या आपल्या अनेक मॉडेल्सवर विविध डिस्काउंट ऑफर्स आणि विविध सवलती देत असतात. सणासुदीच्या निमित्ताने ह्युंदाई कंपनी देखील आपल्या ग्राहकांना फेस्टिवल ऑफर्स आणि डिस्काउंट ऑफर्स देत आहे. जर का तुम्ही ह्युंदाईची नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ऑक्टोबर २०२३ म्हणजेच या महिन्यात ह्युंदाई आपल्या अनेक मॉडेल्सवर ऑफर्स देत आहे. या ऑफर्स काय आहेत याबद्दल अधिक जाणून घेऊयात.

ह्युंदाई i20 N Line

ह्युंदाई i20 हे मॉडेल कंपनीच्या N सेगमेंटमधील मॉडेल आहे. कंपनी आपल्या i20 N सेगमेंटमधील प्री-फेसलिफ्ट मॉडेलवर ५० हजारांपर्यंतचा डिस्काउंट देत आहे. तसेच फेसलिफ्ट ह्युंदाई N सेगमेंटवर १० हजारांचा डिस्काउंट मिळणार आहे. कंपनीने आपले N सेगमेंट भारतात ९.९९ लाख (एक्सशोरूम) रुपयांमध्ये लॉन्च केले होते. याबाबतचे वृत्त Financial Express ने दिले आहे.

During the speech of Devendra Fadnavis the chairs started emptying nashik news
देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणावेळी खुर्च्या रिकाम्या होण्यास सुरुवात
Amit Shah and Vinod Tawde meeting
Vinod Tawde Meeting with Amit Shah: “मराठा मुख्यमंत्री…
Toyota has launched the special edition versions For year end
Toyota Year End Deals : टोयोटाच्या तीन गाड्यांचे लिमिटेड एडिशन लाँच; कारच्या खरेदीवर मिळणार भरपूर अ‍ॅक्सेसरीज
Follow up of demands to candidates through manifesto from Rickshaw Panchayat before elections
रिक्षाचालकांच्या मागण्या ऐरणीवर! निवडणुकीच्या तोंडावर रिक्षा पंचायतीकडून जाहीरनाम्याद्वारे उमेदवारांकडे पाठपुरावा
Govt Issues New Rules To Stop Misleading Ads By Coaching classes
विश्लेषण : शिकवणी वर्गांच्या जाहिरातींना चाप?
passengers in E-Shivneri, E-Shivneri,
ई-शिवनेरीमध्ये अनधिकृतपणे प्रवासी बसवले
investors of DSK, Maval-Mulshi sub-divisional magistrate, Court, DSK,
‘डीएसके’ यांच्या गुंतवणूकदारांची यादी सादर करण्याचे मावळ-मुळशी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना न्यायालयाचे आदेश

हेही वाचा : Petrol-Diesel Price on 14 October: अनेक शहरात पेट्रोल-डिझेलचे दर जैसे थे! तुमच्या शहरात झाली का घट, येथे पाहा…

ह्युंदाई Grand i10 Nios

ह्युंदाई कंपनीची ग्रँड i10 Nios ही एक लोकप्रिय हॅचबॅक कार आहे. सणासुदीच्या काळामध्ये कंपनी या मॉडेलवर ४३ हजारांपर्यंतचा डिस्काउंट देत आहे. सध्या भारतीय बाजारात ह्युंदाई ग्रँड i10 Nios ची किंमत ५.८४ लाख रुपये इतकी आहे. यामध्ये वापरकर्त्यांना १.२ लिटरचे इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन ८२ बीएचपी पॉवर निर्माण करते. ह्युंदाई ग्रँड i10 Nios हे मॉडेल सीएनजी व्हेरिएंटमध्ये देखील उपलब्ध आहे.

ह्युंदाई Aura

ह्युंदाई Aura ही ह्युंदाईची सेडान कार आहे. हे मॉडेल ग्रँड i10 या मॉडेलवर आधारित आहे. ह्युंदाई ऑक्टोबर महिन्यामध्ये या मॉडेलवर ३३ हजारांपर्यंत डिस्काउंट देत आहे. ह्युंदाई Aura भारतीय बाजारामध्ये मारुती सुझुकी डिझायर, टाटा Tigor आणि होंडा अमेझ यांसारख्या गाड्यांशी स्पर्धा करते.

हेही वाचा : दिवाळीआधी स्टाॅक रिकामा करतायत कंपन्या, मारुती, होंडासह ‘या’ कार्सवर तगडा डिस्काउंट जाहीर, पाहा भन्नाट ऑफर

ह्युंदाई Verna

ह्युंदाई वेरना हे कंपनीचे एक लोकप्रिय मॉडेल आहे. आतापर्यंत या कारचे अनेक फेसलिफ्ट आणि नवीन जनरेशनमधील मॉडेल्स भारतीय बाजारामध्ये लॉन्च झाले आहेत. नुकतेच कंपनीने याचे नवीन अपडेटेड मॉडेल लॉन्च केले आहे. ज्याची किंमत १०.९६ लाख रुपयांपासून सुरू होते. सणासुदीच्या काळामध्ये या गादीवर ग्राहकांना २५ हजारांपर्यंतचा डिस्काउंट मिळणार आहे. या कारला NCAP क्रॅश टेस्टमध्ये ५ स्टार रेटिंग मिळाले आहे.