खड्डेमय रस्ते आणि वाहतूक कोंडी यामुळे इच्छित ठिकाणी वेळेवर पोहोचणं कठीण असतं. त्यामुळे अशा अडचणीत असताना थेट उडून एखाद्या ठिकाणी जावं अशी कल्पना आपल्या मनात येतं.अशी वाहनं आपण भविष्याचा वेध घेणाऱ्या काल्पनिक चित्रपटात अनेकदा पाहिली आहेत. आता ही कल्पना प्रत्यक्षात येईल, असं कुणी म्हटलं तर तुम्हाचा विश्वास बसणार नाही. पण भविष्यात ऑटो क्षेत्रात बरेचसे बदल आपल्याला पाहायला मिळणार आहेत. इलेक्ट्रिक वाहनांसोबत आता फ्लाईंग कार आणि ऑक्टोकॉप्टरमधून आपल्याला प्रवास करता येणार आहे. नुकतंच फ्लाईंग सॉसरने सरळ उड्डाण करत भविष्यातील वाहतुकीचा रस्ता दाखवला आहे. वॉशिंगटन आधारित कंपनी झेवा एरोने ही कल्पना प्रत्यक्षात साकार करून दाखवली आहे. झेवा एरोचे सह-संस्थापक आणि सीईओ स्टीपन टिबिट्स यांच्या प्रयत्नांना यश मिळालं आहे. फ्लाईंग सॉसरसारख्या वाहनाच्या प्रोटोटाइपने नुकतेच पूर्ण स्केल वर्टिकल टेकऑफ केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा