इटालियन ऑटो कंपनी Piaggio चा स्कूटर ब्रँड Vespa लवकरच भारतातील इलेक्ट्रिक वाहन सेगमेंटमध्ये प्रवेश करणार आहे. Vespa च्या रेट्रो-एस्थेटिक डिझाइनमुळे ती इटलीमधील लक्झरी स्कूटर ब्रँड म्हणून ओळखली जाते. कंपनीने आता ईव्ही स्पेसमध्ये स्वारस्य दाखवले आहे आणि भारत सरकारद्वारे भविष्यात ईव्हीसाठी सबसिडी बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आत्मनिर्भर होईल, अशी इकोसिस्टम भारतात आणू इच्छिते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Piaggio आणखी एक स्पोर्टी ब्रँड Aprilia देखील त्याच्या बॅनरखाली आणू शकते. आत्तापर्यंत भारतात Vespa इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत अद्याप उघड झालेली नाही. मीडियाशी बोलताना पियाजिओ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक डिएगो ग्राफी म्हणाले की, त्यांना भारतात अशी ईव्ही इकोसिस्टम तयार करायची आहे, जी सबसिडीशिवायही टिकू शकेल. FAME II सबसिडीमुळे, भारतात इलेक्ट्रिक वाहनांची किंमत कमी राहते.

डिएगो ग्राफी म्हणाले, “आम्ही फक्त एंट्री घेण्यासाठी मार्केटमध्ये प्रवेश करू इच्छित नाही. आमच्याकडे पॉवरट्रेन असेल, जी आमच्या वैशिष्ट्यांवर आधारित असेल. आम्हाला शेल्फमधून काहीही काढायचे नाही. त्यामुळे जास्त वेळ लागतो.” Piaggio भारतात तीन चाकी वाहने बनवते. पण त्याचे व्हेस्पा आणि एप्रिलिया ब्रँड्सही इटलीमध्ये दुचाकी वाहने बनवतात. वेस्पा ब्रँड अंतर्गत भारतात इलेक्ट्रिक स्कूटर सादर करू इच्छित असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

यापूर्वी, कंपनीने ऑटो एक्सपो २०२० मध्ये Vespa Elettrica इलेक्ट्रिक स्कूटरचे प्रदर्शन केले होते. हे एका चार्जवर १०० किमी पर्यंतची रेंज देते. बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी चार तास लागतील. मात्र, कंपनीने याआधी युरो-स्पेक इलेक्ट्रिका बद्दल काहीही उघड केले नव्हते. Vespa मधील या इलेक्ट्रिक स्कूटरचे पीक पॉवर आउटपुट ४ kW आहे. कंपनी या स्कूटरचे अपडेटेड व्हर्जन भारतातही लॉंच करू शकते, अशी शक्यता आहे.

इलेक्ट्रिकला ४ KW ची इलेक्ट्रिक मोटर दिली जाईल, जी ५.३६ हॉर्स पॉवरचा पीक पॉवर आणि २० न्यूटन मीटर पीक टॉर्क जनरेट करेल. या स्कूटरची डिझाइन इटलीतील कंपनीने केली असून ही स्कूटर टू-व्हीलर सेगमेंटमध्ये नवीन ट्रेंड प्रस्थापित करेल अशी अपेक्षा आहे. इलेक्ट्रिक स्कूटर असल्याने Vespa Electrica ची किंमत थोडी जास्त असेल. वेगवेगळ्या मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की, भारतीय बाजारात याची किंमत जवळपास ९० हजार रुपये असू शकते. कंपनी ही स्कूटर फक्त स्टँडर्ड मॉडेलमध्ये लॉन्च करण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vespa electric scooter launch date india ola ather electric scooter subsidy on electric vehicle in india scsm