Cow Dung Coating:मे महिना जवळ येऊ लागला आहे तसा उन्हाचा जोरही वाढत आहे. अनेकांच्या गाड्या या उन्हात उभ्या असतात. इमारतीखाली पार्किंग नसेल तर रस्त्यावर किंवा मोकळ्या जागेत कार पार्क करावी लागते. काही कामानिमित्त गेलात तर पुन्हा कारमध्ये येताना प्रचंड उष्णता जाणवते. कडक उन्हापासून कारचे बचाव करण्यासाठी अनेक लोक विविध युक्त्या करत असतात, आता या उन्हापासून आपल्या कारला वाचविण्यासाठी एका व्यक्तीने आपली कार शेणाने झाकली. असे केल्याने एसी नसतानाही कारचे तापमान सामान्य राहते, असा दावा त्या व्यक्तीने केला आहे.
‘या’ कारवर थापलं शेण
मध्य प्रदेशातील एका व्यक्तीने आपली गाडी शेणाने झाकल्याचा व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील होमिओपॅथिक तज्ञ सुशील सागर यांची शेणाने झाकलेली पांढरी मारुती अल्टो कार दिसत आहे. त्यांचा दावा आहे की, यामुळे कारच्या आतील तापमान जास्त गरम होत नाही. ते स्वत: होमिओपॅथिक डॉक्टर आहेत आणि ते म्हणतात की, असे केल्याने वाहनाच्या एसीची कार्यक्षमता देखील सुधारते. कारवर शेण थापण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी, ज्या व्यक्तीने एकदा टोयोटा कार चालवली होती त्याने २०१९ मध्येही असेच केले होते.
(हे ही वाचा: Nexon-Brezza चा खेळ संपणार? Toyota देशात आणतेय ‘Mini Fortuner SUV’, मिळेल ५ आणि ७ सीटरचा ऑप्शन)
शेण गाडी कशी थंड ठेवते
गायीच्या शेणामध्ये उष्णता प्रतिरोधक क्षमता असल्याचा दावा केला जातो. त्यामुळे बाहेरून येणारी उष्णता गाडीच्या आत कमी होऊन गाडी थंड राहते. डॉक्टरांचा दावा आहे की, कारचे छप्पर गरम होण्यासाठी सर्वात जास्त जबाबदार आहे. या मार्गाने, गरम हवा कारच्या आत प्रवेश करते आणि तापमान वाढते. अशा परिस्थितीत गाईचे शेण छतावरच टाकल्यास आतील तापमान सामान्य राहते.