Vinfast Electric SUV’s Coming Soon : व्हिएतनामची सर्वांत मोठी इलेक्ट्रिक वाहन (EV) उत्पादक कंपनी विनफास्ट ( Vinfast) भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. कंपनी मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो २०२५ मध्ये कार, बाईक ते स्कूटर आदी अनेक वाहने सादर करणार आहे. याचबरोबर अशी माहिती समोर येते आहे की, कंपनी भारतात दोन प्युअर इलेक्ट्रिक वाहने VF7 आणि VF9 सह भारतात पाऊल टाकणार आहे. आगामी भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो २०२५ मध्ये ही इलेक्ट्रिक वाहने प्रदर्शित केली जातील. त्याबद्दल कार निर्मात्याने त्याच्या सोशल मीडिया हॅण्डलवरदेखील हिंट दिली आहे.
जवळपास एक वर्षापूर्वी ‘विनफास्ट’ने (Vinfast) तमिळनाडू सरकारबरोबर करार केला होता. त्यानुसार राज्यात ईव्ही उत्पादन सुविधा विकसित करण्यासाठी चार हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल, असे सांगण्यात आले होते. तर, आता व्हिएतनामच्या ऑटोमेकरने त्याच्या जागतिक पोर्टफोलिओमधून दोन प्रीमियम मॉडेल भारतात आणण्याचा निर्णय घेतला आहे. चला, प्रत्येक मॉडेल आणि त्या मॉडेलमध्ये काय विशेष असणार ते पाहून घेऊ…
व्हीएफ ७ (VF7)
पाच आसने (सीट) असणारी विनफास्टची (Vinfast) इलेक्ट्रिक एसयूव्ही व्हीएफ ७ (VF7) ४,५४५ मिमी लांब, १,८९० मिमी रुंद आणि १,६३५. ७५ मिमी उंच आहे. त्याचा व्हीलबेस २,८४० मिमी आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर ही एसयूव्ही इको आणि प्लस या दोन ट्रिममध्ये उपलब्ध असणार आहे. दोन्हींमध्ये ७५.३ केडब्ल्यूएच बॅटरी पॅक आहे. इको ट्रिम फ्रंट व्हील्स (पुढच्या चाकांना) ऊर्जा देणाऱ्या सिंगल मोटर सेटअपसह येते, जी 201 bhp आणि 310 Nm टॉर्क जनरेट करते. ही व्हेरिएंट एका चार्जवर ४५० किमी धावते.
पोस्ट नक्की बघा…
व्हीएफ ७ प्लस (VF7 Plus)
व्हीएफ ७ (VF7) प्लस ही गाडी फॉर व्हील्स (चारही चाकांना) ऊर्जा देणाऱ्या ड्युअल-मोटर सेटअपसह येते आणि ४३१ किमीच्या सिंगल चार्ज रेंजचा दावा करतो. ही पॉवरट्रेन 348 bhp चे पीक आउटपुट आणि 500 Nm टॉर्क जनरेट करते. या वाहनाच्या फीचर्सच्या बाबतीत सांगायचे झाल्यास VF7 एक तर १२.९ इंच (Eco) किंवा OTA अद्यतनांसह (अपडेट) १५ इंच (प्लस) टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टीम, लेव्हल २ ॲडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम ऑफर करते.
व्हीएफ ९ (VF9)
व्हीएफ ९ ही VinFast ची फ्लॅगशिप इलेक्ट्रिक एसयूव्ही आहे, जी ६ सीट किंवा ७ सीट केबिन लेआउटसह येते. आता ही एसयूव्ही कॅप्टन सीटसह येणार आहे. VF9 ची लांबी ५,११९ मिमी, रुंदी २०० मिमी व उंची १,६९४ मिमी आहे. फूल साईज इलेक्ट्रिक एसयूव्हीचा व्हीलबेस ३१४८ मिमी आहे. VF7 प्रमाणे VF9 देखील आंतरराष्ट्रीय स्तरावर इको (Eco) व प्लस (Plus) या दोन ट्रिममध्ये उपलब्ध आहे:
दोन्ही प्रकारांमध्ये १२३ kWh बॅटरी पॅक आहे; जो ड्युअल-मोटर ऑल-व्हील ड्राइव्ह सेटअपला चालना देतो आणि 402 bhp व 620 Nm पीक टॉर्क जनरेट करतो. व्हीएफ ९ 200 kmph चा टॉप स्पीड गाठू शकतो आणि इको व प्लस व्हेरिएंटसाठी ६.६ सेकंद व ६.७ सेकंदांत ० ते १०० kmph पर्यंत वेग वाढवू शकतो. इको ट्रिम ५३१ किमीच्या रेंजचे वचन देते; तर प्लस ट्रिम एका चार्जवर ४६८ किमीपर्यंत धावते.
VF9 मध्ये समाविष्ट असलेल्या फीचर्समध्ये एलईडी हेडलाइट्स, टेललाइट्स, ऑटो ॲडजस्टेबल व हीटेड ORVM, मसाज फंक्शनसह हवेशीर व हीटेड (heated) फ्रंट रिअर सीट्स, थ्री-झोन क्लायमेट कंट्रोल, हेड-अप डिस्प्ले, १५.६ इंच टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट डिस्प्ले, ऑटो डिमिंग IRVM आणि बरेच काही समाविष्ट असणार आहे. तसेच VF9 मध्ये ११ एअरबॅग्ज, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम आणि ADAS वैशिष्ट्यांद्वारे सुरक्षिततेची काळजी घेतली जाईल.