भारताचा सुपरस्टार आणि भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीच्या (Virat Kohli) कार कलेक्शनची नेहमीच चर्चा असते. त्याच्या गॅरेजमध्ये असलेल्या अनेक लक्झरी आणि स्पोर्ट्स कारची किंमत करोडोंच्या घरात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या कार कलेक्शनच्या बातम्या सतत मीडियात येत असतात. सध्या विराट कोहलीकडे एकापेक्षा एक आलिशान आणि दमदार कार आहेत. ते भारतातील ऑडीचे ब्रँड अॅम्बेसेडर देखील आहेत आणि त्यांच्याकडे अनेक उत्तम ऑडी कार आहेत. पण, विराट कोहलीची पहिली कार कोणती होती हे तुम्हाला माहीत आहे का? बहुधा ही गोष्ट फार कमी लोकांना माहीत असेल.

विराट कोहलीची पहिली कार कोणती?

एका मुलाखतीदरम्यान विराट कोहलीने स्वतःची पहिली कार कोणती होती याचा खुलासा केलाय. कोहलीची पहिली कार टाटा सफारी होती. मुलाखतीत कोहलीने सांगितले की, त्याने स्वतःसाठी पहिली कार खरेदी केली ती टाटा सफारी होती. या कारची त्यावेळी प्रचंड क्रेझ होती. सफारी कार दिसताच रस्त्याने चालणारे लोकं बाजुला व्हायचे. या गाडीचा क्रेझ पाहून मला कार खरेदी करण्याची प्रेरणा मिळाली, असे विराटने सांगितले.

(हे ही वाचा :‘ही’ आहे भारतातली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर; किंमत कमी, मोठ्या रेंजची हमी, एकदा चार्ज केल्यावर धावेल…)

डिझेल कार घेतली अन् भरलं पेट्रोल

यासोबतच विराट कोहलीने त्याच्या पहिल्या कारशी संबंधित एक मजेदार किस्साही सांगितला. त्यांनी विकत घेतलेली टाटा सफारी डिझेल इंजिनची होती. आताही टाटा सफारी फक्त डिझेल इंजिनमध्ये येते. विराट कोहलीने सांगितले की, सफारी खरेदी केल्यानंतर तो आणि त्याचा भाऊ फिरायला बाहेर पडले, त्यानंतर त्याचा भाऊ पेट्रोल पंपावर गेला आणि त्याने टाकी भरण्यास सांगितले पण पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला टाकीमध्ये पेट्रोल भरायचे की डिझेल हे सांगितले नाही.

कोहलीने सांगितले की, पेट्रोल पंप कर्मचाऱ्याने कारच्या टाकीत पेट्रोल भरले होते. मग त्याने गाडी थोडी पुढे नेली तेव्हा ती झटके देऊ लागली अन् मग अचानक थांबली. त्यांना वाटले की, कार खराब झाली पण नंतर समजले की, टाकीमध्ये डिझेल ऐवजी पेट्रोल भरले होते. त्यानंतर तीच टाकी रिकामी करून त्यात डिझेल भरण्यात आले, हा किस्सा सांगताना विराट पोट धरून हसला. 

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohlis first car virat kohli shares a funny story as he recalls buying his first car pdb