भारतीय कारप्रेमींमध्ये कायमच नव्या गाड्यांबद्दल उत्सुकता असते. बाजारात कोणती नवी गाडी येणार आहे, इथपासून ते काय फिचर्स असतील याबद्दल कुतूहल असते. आता भारतीय बाजारात आणखी एक नवी गाडी येणार आहे. फॉक्सवॅगन इंडिया ७ डिसेंबरला टिगुआगन गाडी लॉन्च करणार आहे. याबाबतची घोषणा कंपनीने सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे. फेसलिफ्टेड ५-सीटर एसयूव्ही ब्रँड इंडिया २.० स्ट्रॅटेजीचा भाग आहे.कार ब्रँडने भारतात लॉन्च करण्याची घोषणा केलेल्या चार एसयूव्ही पैकी एक आहे. अद्ययावत टिगुआनने २०२० मध्ये जागतिक पदार्पण केलं होतं. आता एसयूव्ही भारतीय शोरूममध्ये येण्यास सज्ज आहे. टिगुआन लॉन्च केल्यावर जीप कंपास, ह्युंदाई टक्सन आणि सिट्रोएन C5 एअरक्रॉस सारख्या गाड्यांशी स्पर्धा करेल. प्री-फेसलिफ्ट टिगुआन प्रमाणे, फोक्सवॅगनचे उद्दिष्ट प्रतिस्पर्ध्यांविरूद्ध स्पर्धात्मक किंमत ठेवण्यासाठी भारतात मध्यम आकाराच्या प्रीमियम एसयूव्हीला स्थानिक पातळीवर असेंबल करण्याचे आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा