Volkswagen ही एक लोकप्रिय वाहन उत्पादक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवनवीन मॉडेल्स लॉन्च करत असते. आता सुद्धा ग्राहकांसाठी कंपनीने अपडेटेड Tiguan SUV ला नवीन फीचर्ससह लॉन्च केली आहे. या एसयूव्हीचे अपडेटेड फीचर्स , इंजिन आणि किंमत याबद्दल जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Volkswagen Tiguan चे फीचर्स

नवीन फॉक्सवॅगन Tiguan मध्ये वायरलेस फोन चार्जिंग पॅडसह ड्युअल टोन ग्रे इंटेरिअर मिळते. आता हे अपडेटेड एसयूव्ही पार्क असिस्ट फीचरने लेस असणार आहे.अन्य फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये एअरबॅग, ABS, ESC आणि अँटी स्लिप रेग्युलेशन, हिल स्टार्ट असिस्ट, हिल डिसेंट कंट्रोल आणि इंजिन ड्रॅग टॉर्क कंट्रोल TPMS, थ्री-पॉइंट सीट बेल्ट, ISOFIX चाइल्ड सीट माउंट व ड्रायव्हर अलर्ट सिस्टीमचा समावेश आहे. यासह यामध्ये अन्य फीचर्सचा समावेश आहे. याबाबतचे वृत्त Financial Express ने दिले आहे.

हेही वाचा : Petrol-Diesel Price on 19 May: पेट्रोल-डिझेलचे दर वाढले की घटले? वाचा तुमच्या शहरातील दर

इंजिन आणि गिअरबॉक्स

फॉक्सवॅगन Tiguan मध्ये पॉवर देण्यासाठी यामध्ये २.० लिटर टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. ज्यामध्ये १८७ बीएचपी मॅक्स पॉवर आणि ३२० एनएम पीक टॉर्क जनरेट करते. हे TSI इंजिन आता BS6 फेज-2 आणि RDE नियमांनुसार आहे. हे 7-स्पीड DSG सह येते. यामध्ये Volkswagen चे 4मोशन ऑल-व्हील-ड्राइव सिस्टमही देण्यात आले आहे.

Volkswagen ने लॉन्च केले अपडेटेड एसयूव्ही (Image Credit- Financial Express)

फॉक्सवॅगन Tiguan एसयूव्हीचे अपडेटेड मॉडेल लॉन्च करताना फॉक्सवॅगन पॅसेंजर कार्स इंडियाचे ब्रँड डायरेक्टर आशिष गुप्ता म्हणाले, ”अपडेटेड Tiguan सह आम्ही आमच्या ग्राहकांना स्टाईल, परफॉर्मन्स, प्रीमियमनेस, सुरक्षितता आणि क्लास लिडिंग फीचर्सचे एक उत्तम मॉडेल सादर करत आहोत.”

हेही वाचा : Car Tips : पेट्रोलवर चालणाऱ्या गाडीमध्ये डिझेल भरल्यास काय होईल? यानंतर गाडी चालते का? जाणून घ्या

2023 Volkswagen Tiguan ची किंमत

फॉक्सवॅगन इंडियाने अपडेटेड Tiguan एसयूव्ही लॉन्च केली आहे. कंपनीने हे एसयूव्ही मॉडेल ३४.६९ लाख रुपयांना भारतात लॉन्च केले आहे.