Volkswagen ही एक लोकप्रिय वाहन उत्पादक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवनवीन फीचर्स आणि अपडेटेड मॉडेल्स लॉन्च करतच असते. आता फॉक्सवॅगन कंपनी लवकरच भारतात आपली Tiguan क्रॉसओव्हरची थर्ड जनरेशन लॉन्च करणार आहे. त्याआधी कंपनी या मॉडेलची काही माहिती सादर केली आहे. तर लवकरच लॉन्च होणाऱ्या या मॉडेलमध्ये ग्राहकांना काय काय फीचर्स मिळणार आहे आणि याची किंमत, इंजिन याबाबद्दलचे अपडेट्स जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवीन Volkswagen Tiguan मध्ये अ‍ॅक्टिव्ह सस्पेंशन आणि मॅट्रिक्स एलईडी हेडलाईट्स यासारखे अनेक फीचर्स देण्यात येतील. ही क्रॉसओव्हर फॉक्सवॅगनच्या MBQ Evo प्लॅटफॉर्मवर आधारित असेल. 2024 Volkswagen Tiguan १०० किमीच्या ऑल इलेक्ट्रिक रेंजसह प्लग इन हायब्रीड इंजिन असण्याची अपेक्षा आहे. तसेच यासह चार इंजिन पर्याय मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये टर्बो डिझेल, टर्बो पेट्रोल आणि एक माईल्ड हायब्रीड युनिट असू शकते. याबाबतचे वृत्त Financial Express ने दिले आहे.

हेही वाचा : Upcoming Cars July 2023: जुलै महिन्यात लाॅन्च होणार ‘या’ दमदार कार्स, किंमत आणि फीचर्स पहाच

नवीन Tiguan मध्ये adaptive सस्पेंशन परत आणले जाणार आहे. कारमध्ये दोन व्हॉल्व्ह शॉक अ‍ॅब्जॉर्बरचा वापर केला जाणार आहे. तसेच यात MBQ व्हेईकल डायनॅमिक मॅनेजर देखील मिळेल. जे स्पेसिफीक व्हील्स आणि सिलेक्टिव्ह व्हील्स अ‍ॅडजस्टमेंटचा हार्डन्स अ‍ॅड्जस्ट करून हँडलिंगची गुणवंता सुधारते.

Volkswagen ग्राहकांच्या आवश्यकतेनुसार कारच्या इंटेरिअरमध्ये देखील सुधारणा केली आहे. याचाच एक भाग म्हणजे २०२४ मध्ये लॉन्च होणाऱ्या या कारमध्ये दोन डिजिटल डिस्प्ले असतील त्यातील एक इन्फोटेनमेंट सिस्टम म्हणून आणि दुसरा डिजिटल कॉकपिट. इन्फोटेनमेंट सिस्टम कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, नेव्हिगेशन आणि बरीच अनेक कनेक्टिव्हीटी फीचर्स ऑफर करेल.

हेही वाचा : बजाज पल्सर, हिरो सुपर स्प्लेंडरला टक्कर देण्यासाठी लॉन्च झाली Honda ची ‘ही’ बाईक, जाणून घ्या

कधी होणार लॉन्च ?

या अपडेटेड 2024 Volkswagen Tiguan बद्दल कंपनीने अन्य कोणतेही डिटेल्स शेअर केलेले नाहीत. कारण फोक्सवॅगनने अद्याप अधिकृतपणे मॉडेलचे अनावरण केलेले नाही. रिपोर्टनुसारमी २०२४ च्या सुरूवातीला या कारला लॉन्च केले जाऊ शकते. २०२४ मधील फॉक्सवॅगन Tiguan सध्याच्या मॉडेलपेक्षा थोडी प्रीमियम असेल ज्याची किंमत ३४.६९ लाख रुपये असण्याची अपेक्षा आहे.