सध्या ऑटोमोबाईल क्षेत्रात इलेक्ट्रॉनिक वाहनांचा बोलबाला आहे. यात कार आणि मोटारसायकलसोबत इ-सायकलची मागणीही वाढली आहे. व्होल्ट्रॉन मोटर्सने सायकलची वाढती क्रेझ पाहता दोन इलेक्ट्रिक सायकल लॉन्च केल्या आहेत. यामुळे पेट्रोलच्या वाढत्या किंमतीपासून तर सुटका होईलच, शिवाय आरोग्यस फायदे होतील. कंपनीने VM50 आणि VM100 नावाने दोन इलेक्ट्रिक सायकल लॉन्च केल्या आहेत. त्यांच्या किंमती आणि वैशिष्ट्यांसह रेंज देखील भिन्न आहे. जर तुम्ही या इलेक्ट्रिक सायकल घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती असणे आवश्यक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्होल्ट्रॉन मोटर्सच्या VM 50 सायकलची किंमत ३५ हजार रुपये आहे. तर VM 100 सायकलची किंमत ३९,२५० रुपये आहे. तुम्ही या इलेक्ट्रिक सायकल्स ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही खरेदी करू शकता. तसेच, या दोन्ही इलेक्ट्रिक सायकल्स काळ्या, पिवळ्या, निळ्या आणि लाल रंगात उपलब्ध आहेत.

Royal Enfield कंपनीने Classic 350 मॉडेलच्या २६,३०० गाड्या परत मागवल्या; कारण…

व्होल्ट्रॉन मोटर्सच्या दोन्ही इलेक्ट्रिक सायकल्स फक्त ४ रुपये किमतीत पूर्णपणे चार्ज होतात. एका चार्जमध्ये या दोन्ही इलेक्ट्रिक सायकल्सची रेंज ७५ ते १०० किमीपर्यंत आहे. VM50 आणि VM100 इलेक्ट्रिक सायकल्सचा स्पीड २५ किमी प्रति तास आहे. आतापर्यंत बाजारात सर्व इलेक्ट्रिक सायकली सिंगल सीट राइड्स आहेत. पण आता देशातील पहिली डबल राईड सायकल आली आहे. व्होल्ट्रॉन मोटर्सचे सीईओ प्रशांत कुमार यांचा दावा आहे की त्यांची इलेक्ट्रिक सायकल ही देशातील पहिली डबल राइड इलेक्ट्रिक सायकल आहे.

.