भारतीय कार बाजारात नवीन कारसोबतच सेकंड हँड कार खरेदीलाही ग्राहक पसंती देत आहेत. कमी किंमतीत चांगली कार मिळत असल्याने या व्यवसायात वृद्धी झाली आहे. सेकंड हँड कार व्यवसायात आलेली तेजी पाहून जगात आलिशान कार बनवणारी एक नामांकित कंपनी या व्यवसायात उतरली आहे.

स्विडनची प्रिमियम कार कंपनी (Volvo second hand car) व्होल्वोला २०२४ पर्यंत भारातातील तिच्या प्रमाणित सेंकंड हँड कार विक्री व्यवसायाचा संपूर्ण देशात विस्तार करायचा आहे. आणि आपल्या व्वसायात त्याची भागीदारी एक तृतियांश होण्याची तिला आशा आहे.

‘सिलेक्ट’ नावाने व्यवसाय सुरू

आम्ही भारतात अलिकडेच पायलट प्रोजेक्ट म्हणून दोन डिलरसोबत ‘सिलेक्ट’ नावाने जुन्या कारचा व्यवसाय सुरू केला आहे. हा व्यवसाय आम्ही हळू हळू वाढवणार आहोत,आणि वर्ष २०२३ आणि २४ च्या सुरुवातीपर्यंत त्यास देशभरात पसरवायचे आहे, अशी माहिती व्होल्वो कार इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक ज्योती मल्होत्रा यांनी माध्यमांना दिली आहे.

तर ग्राहकांना चांगली किंमत मिळेल

ज्योती पुढे म्हणाल्या की, जर सेकंड हँड कार व्यवसायात कार कंपन्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला तर ग्राहकांना चांगली गुणवत्ता आणि किंमत मिळू शकेल.

भारतात सेकंड हँड कार विक्री तेजीत

इंडियन ब्ल्युबूक आणि दास वेल्ट ऑटोने एक अहवाल सादर केला आहे. यामध्ये २०१६ – २७ पर्यंत भारतातील सेकंड हँड कार बाजारपेठेत जवळपास २० टक्क्यांची वाढ होणार आहे. हे पाहता सेकंड हँड कार व्यवसायासाठी व्होल्वोचे प्रयत्न योग्य दिशेने असल्याचे समजते.

Story img Loader