Tata Curvv EV साठी बुकिंग १२ ऑगस्टला सुरु होणार आहे. अनेक ग्राहक ही कार खरेदी करण्याचा विचार करत आहेत पण या कारबाबत काही प्रश्न पडत आहे. त्यापैकीच एक मोठा प्रश्न असा आहे की, EV किती व्यवहार्य पर्याय आहे? रेंज, बॅटरीचे आयुष्य आणि सुरक्षितता या काही प्रमुख समस्या आहेत. याबाबत टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटीचे चीफ कमर्शियल ऑफिसर विवेक श्रीवत्स म्हणाले की, “टाटा कर्व ही ईव्ही रेंजमध्ये आणखी नवीन बदल घडवण्यासाठी आणि ईव्ही रेंज बरेच नवीन ग्राहक आणण्यासाठी एक महत्त्वाची कार आहे. कारण ती ईव्हीबद्दलच्या अनेक सामान्य गैरसमजांना दूर करण्यात मदत करते.

इलेक्ट्रिक Tata Curvv बुक करण्याआधी इलेक्ट्रिक वाहनांबाबतचे हे ४ गैरसमज दूर करा

१. इलेक्ट्रिक कार पुरेशी रेंज देत नाही: (An electric car does not offer enough range)

इंटरनल कंबक्शन इंजन ऐवजी इलेक्ट्रिक वाहनाकडे वळणाऱ्या बऱ्याच जणांना रेंजबद्दल चिंता वाटते. चिंतेची बाब म्हणजे लांब पल्ल्याचा किंवा अवघड भूप्रदेशांचा प्रवास करता येत नाही. इलेक्ट्रिक Tata Curvv ग्राहकांना भेडसावणाऱ्या अनेक मूलभूत समस्यांचे निराकरण करते. श्रीवत्सच्या मते, ‘कर्व्हची “रिअल-टाइम रेंज ४०० अधिक किलोमीटर आहे.” ARAI नुसार त्याची रेंज ५८५ आहे आणि आम्ही त्यापुढे जाऊन ४००- ४३५ किलोमीटरची सी ७५ रेंज (C75) देत आहोत. संभाव्य ग्राहक असे म्हणत आहेत की, एकदा ४०० किलोमीटरपेक्षा जास्त, वास्तविक-जागतिक रेंजमधील इलेक्ट्रिक कार आल्यास, ते खरोखरच अनेकांना घरी प्राथमिक कार म्हणून स्वीकारण्याची शक्यता असेल.”

Two rickshaws collided after minor driver lost control of tempo
अल्पवयीन चालकाचे टेम्पोवरील नियंत्रण सुटल्याने दोन रिक्षांना धडक
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Confusion due to incorrect announcements in running local trains
पुढील स्थानक ‘चुकीचे’! धावत्या लोकल गाड्यांमधील चुकीच्या उद्घोषणांमुळे संभ्रमावस्था
Pune will soon be known as an electronic cluster says Ashwini Vaishnav
पुण्याची ओळख लवकरच ‘इलेक्ट्रॉनिक क्लस्टर’, काय म्हणाले अश्विनी वैष्णव?
Heavy vehicles banned in Narhe area on outer ring road
पुणे : बाह्यवळण मार्गावरील नऱ्हे परिसरात जड वाहनांना बंदी
mmrda planning to build a creek bridge from kasarvadavali to kharbav in bhiwandi
ठाणे आणि भिवंडी शहरातील अंतर कमी होणार; कासारवडवली ते खारबाव खाडीपुलासह जोडरस्ता प्रकल्पाची आखणी
Hyundai Creta EV feature make tea or cofee charge gadgets in this car with v2l feature
आता चहा आणि कॉफीसाठी कारमधून उतरायची गरज नाही! Hyundai Creta EV मध्ये मिळणार जबरदस्त फीचर
Palkhi Highway, Nitin Gadkari , Union Minister Nitin Gadkari,
पालखी महामार्गाच्या कामाबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दिले ‘हे’ आदेश !

हेही वाचा – अवघ्या १ लाखांमध्ये घरी आणा मारुतीची दमदार मायलेज देणारी कार, पाहा कुठे मिळतेय ही जबरदस्त डील

२. पुरेसे इलेक्ट्रिक कार चार्जर उपलब्ध नाहीत (Not enough EV chargers available: )

प्रवासाच्या मार्गावर चार्जिंग पॉइंट्सची उपलब्धता ही अनेक इलेक्ट्रिक कार मालकांसाठी चिंतेची बाब आहे. टाटा दावा करतात की, “ते चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यासाठी टाटा पॉवर ग्रुप कंपनीmu काम करत आहेत. “आता आमचा चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर अगदी खाजगी कारच्या चार्जिंगसाठी उपलब्ध करणार आहोत. शुल्क प्रदान करून किंवा प्रमाणित पूर्व-मालकीचे(CPOs) कार आमच्या चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये करू शकतात जेणेकरून ते संबंधित ठिकाणी कार चार्ज करू शकतात. चार्जिंगसाठी पायाभूत सुविधांचा विस्तार आणि वेग वाढवण्यासाठी सरकार आणि तेल विपणन कंपन्यांसह काम करत आहोत,”असेही श्रीवत्सा यांनी सांगितले. “ईव्ही चांगले का आहे हे ग्राहकांना समजावून सांगण्यासाठी मोठ्या मार्केटिंग मोहिमा देखील हाती घेत आहेत.”

३) इलेक्ट्रिक कार बॅटरी किती काळ टिकतात (How long do EV batteries last- cost of replacement:)

: इलेक्ट्रिक कार बॅटरीची किंमत हा सर्वात मोठा खर्च आहे आणि बऱ्याचदा वापरकर्त्यांना असा प्रश्न पडतो की बॅटरी बदलण्याची आवश्यकता असल्यास काय होईल. श्रीवत्स सांगतात की, सामान्यत: बॅटरी ईव्हीपेक्षा जास्त काळ टिकते आणि बॅटरीचे आयुष्य “२५००-३००० सायकल्स दरम्यान असते, जे प्रत्यक्षात ७-१० लाख किलोमीटर असते. भारतात १ लाख किलोमीटरसुद्धा कोणी गाडी चालवत नाही. स्पष्टपणे, बॅटरी कारपेक्षा जास्त काळ टिकेल. शिवाय, बॅटरीचा घरात काही उपकरणे चालवण्यासाठी किंवा दूरच्या शेतात मोटार चालवण्यासाठी पुन्हा वापर केला जाऊ शकतो, लोकांना याची माहिती नाही. ते म्हणाले की, ” बॅटरीचे दिर्घकाळ टिकते आणि एखाद्याला संपूर्ण बॅटरी बदलण्याची आवश्यकता नाही.”

हेही वाचा – नवीन बाईक घ्यायची असेल तर पैसे ठेवा तयार! दिवाळीच्या आधी लाँच होणार बजाज ट्रायम्फच्या दोन नवीन बाईक

४ ) इलेक्ट्रिक कार महाग आहेत:

इलेक्ट्रिक कारची किंमत देखील तिचा वापर करण्याच्या दृष्टीने एक प्रमुख अडथळा आहे. Tata Curvv च्या किंमती आणि आकारावर भाष्य करताना, श्रीवत्सा पुढे म्हणाले की, “लोक सहसा कुटुंबासाठी ४.३-मीटर SUV ला प्राधान्य देतात आणि Curvv EV अनेक मध्यम आकाराच्या ICE कारसाठी एक चांगला पर्याय आहे. वेगवान चार्जिंग सक्षम केले आहे आणि अर्थातच आम्ही त्याची किंमत तुलनात्मक ICE ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायांपेक्षा कमी आहे. त्यामुळे आमच्यासाठी, ईव्ही रेंज आणखी विस्तारण्यासाठी ही एक अतिशय महत्त्वाची कार आहे.” ‘

Story img Loader