Bike Maintenance Tips: खेडेगावांपासून ते शहरांपर्यंत बाईकचालकांचे प्रमाण सर्वाधिक वाढले आहे. याचे कारण म्हणजे बाईक सहज कोणत्याही प्रकारच्या रस्त्यावर चालवता येते. याशिवाय बाईकचे मायलेजही चांगले असते. मात्र, इतर वाहनांप्रमाणेच बाईकचीही वेळेवर सर्व्हिसिंग करावी लागते. बऱ्याचदा यासाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागतात. परंतु, काही गोष्टींची माहिती मिळाल्यास तुम्ही बाईकच्या देखभालीचा आणि सर्व्हिसिंगवर होणारा खर्च वाचवू शकता, यासाठी बाईकशी संबंधित काही मूलभूत गोष्टी जाणून घेणे आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या बाईकची घरच्या घरी काळजी कशी घेऊ शकता आणि त्यासाठी तुम्हाला कोणत्या गोष्टींची आवश्यकता असेल, हे आज आम्ही या बातमीच्या माध्यमातून सांगू
कमी खर्चात बाईकची घ्या काळजी
तेल बदला
तुमच्या बाईकमधील इंजिन तेलाचे प्रमाण त्याच्या इंजिनवरच लिहिलेले असते. तसेच बाईकच्या सर्व्हिस बुकलेटवरही ही माहिती उपलब्ध असते. तुम्हाला इंजिनच्या खालच्या बाजूला एक नट दिसेल. हा नट उघडल्याने बाईकच्या इंजिनमधील जुने तेल निघून जाईल. सर्व तेल आटल्यानंतर नट पुन्हा घट्ट करा. यानंतर इंजिनमधील तेल भरण्याची कॅप उघडा आणि त्यात नवीन तेल घाला.
डिस्क ब्रेक
जर तुमच्या बाईकमध्ये डिस्क ब्रेक लावले असेल तर त्याचे तेलदेखील बदलणे आवश्यक आहे. बाईक चालवल्यामुळे तेलाची पातळीदेखील कमी होऊ शकते, अशा स्थितीत बाईकमध्ये ब्रेक ऑइल पुरेशा प्रमाणात घाला.
साखळी साफ करा
बाईक चेन साफ करण्यासाठी तुम्ही रॉकेल किंवा डिझेल वापरू शकता. ब्रशच्या मदतीने डिझेल किंवा पेट्रोल लावून चेन साफ करा. त्यानंतर ब्रशच्या मदतीने साखळी व्यवस्थित स्वच्छ करा. नंतर साखळीवर ग्रीस लावा, पण ग्रीस जास्त लागणार नाही याची काळजी घ्या, नाहीतर त्यावर धूळ जमा होईल.
हेही वाचा: अचानक बाईक थांबवतेवेळी आधी ब्रेक दाबायचा की क्लच? ‘या’ चार टिप्स करतील मदत
बाईक पाण्याने स्वच्छ करा
बाईक सर्व्हिसिंग करण्यापूर्वी तुम्ही ती एकदा जास्त प्रेशरच्या पाण्याने धुवा. यामुळे बाईकमध्ये साचलेली धूळ, चिखल आणि घाण निघून जाईल. त्यामुळे बाईकची सर्व्हिसिंग करणे सोपे होईल.