five simple tricks to make your car new look: गाडी खरेदी करणे हे अनेकांचे स्वप्न असले तरीही गाडी घेतल्यानंतर सर्व्हिसिंग आणि मेंटेनन्स करणेही महत्त्वाचे आहेच. पण, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गाडी स्वच्छ ठेवणे आणि ती शक्य तितक्या काळासाठी नवीन दिसणे. सुरुवातीला गाडी नवीन असताना आपण दररोज गाडी ओल्या किंवा सुक्या कापडाने स्वच्छ करतो. त्याला कव्हर घालून ठेवतो. गाडीतले काही फीचर्स, टायर दररोज तपासतो. पण, कालांतराने आपण गाडीकडे दुर्लक्ष करतो, म्हणून गाडी जुनी दिसू लागते. पण, जर तुम्ही गाडीची नियमित देखभाल केली तर ती वर्षानुवर्षे नवीकोरी दिसू शकते. पण, यासाठी तुम्हाला कोणताही जास्तीचा खर्च करण्याची गरज नाही. तुम्ही घरच्या घरी गाडी स्वच्छ करू शकता. गाडी (Car) स्वच्छ आणि अगदी नवीन दिसण्यासाठी पाच स्टेप्स पुढीलप्रमाणे आहेत…

गाडी साफ करायला काही लोक उत्साहाने तयार होतात. सुटीचा दिवस ते या कामासाठी राखून ठेवतात. पण, गाडीला व्यवस्थित स्वच्छ करण्यासाठी एक किंवा त्यापेक्षा अधिक तासाचासुद्धा वेळ लागू शकतो.

पूर्ण गाडी (Car) स्वच्छ धुवा :

पहिली पायरी गाडी स्वच्छ धुणे. तुमच्याकडे प्रेशर वॉशर असल्यास गाडी पूर्णपणे स्वच्छ करण्यास मदत होते. यामुळे तुमच्या गाडीमधील सहज घाण काढून टाकता येते. तर यासाठी गाडीवर साबणाचा फेस टाका आणि पुन्हा स्वच्छ धुवून घ्या. गाडी धुण्यासाठी तुम्ही दुसरा पर्याय म्हणून कापड वापरू शकता. तुमच्याकडे प्रेशर वॉशर नसल्यास, कार पूर्णपणे स्वच्छ धुण्यासाठी दोन पाण्याच्या बादलीचा वापर करा. एका बादलीत गाडी वॉश करण्याचे शॅम्पू आणि दुसऱ्या बादलीत साधं पाणी घ्या. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही गाडीवर कापड वापरता, तेव्हा साबणाच्या पाण्यात बुडण्यापूर्वी ते साध्या पाण्याच्या बादलीत बुडवा. ही पद्धत स्क्रॅच टाळते. याला टू-बकेट पद्धत म्हणतात.

गाडीची अंतर्गत स्वच्छता :

गाडीच्या बाह्य़ भागाप्रमाणेच अंतर्गत भागाचीही स्वच्छता आवश्यक आहे. गाडीच्या आतील भाग स्वच्छ करण्यासाठी तुम्हाला थोडा वेळ लागू शकतो. त्यासाठी सर्वात आधी तुम्ही फ्लोअर मॅट्सपासून सुरुवात करा, त्यानंतर कार्पेट्स व्हॅक्यूम करा. गाडीच्या सीट्सचे कव्हर काढून ते धुवून घ्या किंवा पायाजवळील भागातील रबराचे तुकडे काढून ते साफ करा. नंतर डॅश क्लिनरने किंवा पाण्याने डॅशबोर्ड पूर्णपणे पुसून टाका. तुमच्याकडे लेदर सीट असल्यास, लेदर कंडिशनरने स्वच्छ धुवा किंवा पुसून घ्या. चांगल्या दर्जाचे रूफ लाइनिंग क्लीनर वापरा आणि रूफ लाइनर साफ करताना थोडं हळूवार साफ करा. याचबरोबर खिडक्यादेखील स्वच्छ करून घ्या.

हेही वाचा…Bike Service: किती दिवसांनी करावी बाईकची सर्व्हिसिंग? योग्य वेळ जाणून घ्या; पावसाळ्यात प्रवास होईल सुखाचा

गाडीमध्ये असणारे लहान भाग साफ करणे थोडे कठीण जाते. त्यासाठी जुने टूथब्रश वापरा आणि गाडीच्या बाह्य़ भागाप्रमाणेच अंतर्गत भागाचीही स्वच्छता करून घ्या. पेंट केलेल्या पृष्ठभागावर टूथब्रश वापरणे टाळा. कारण यामुळे पेंट स्क्रॅच होऊ शकते. चाके स्वच्छ करण्यासाठी ब्रश वापरा. एअर व्हेंट्समध्ये स्वच्छ करण्यासाठी ब्रश वापरा.

टायर :

आता टायरकडे लक्ष द्या. गाडीचे तयार ब्रेक, धुळीमुळे खराब होतात. साधे पाणी, एक मऊ ब्रश किंवा व्हील क्लीनरसह तुम्ही हे स्वच्छ करू शकता; ज्यामुळे प्रक्रिया जलद होते. हार्ड ब्रशने चाके घासण्यासाठी तुम्ही गाडीचा शैम्पू, नियमित शैम्पू किंवा कोणताही साबण वापरू शकता. त्यानंतर गाडीचे दरवाजे धुवा, कारण हे गाडी चकचकीत दिसण्यात भर घालू शकते.

क्रीम पॉलिश

दररोजच्या वापराने किंवा एका जागी उभी राहिल्यानंतरही गाडीवर साचणाऱ्या धुळीमुळे तिची चमक नाहिशी होते. मात्र क्रीम पॉलिशने ही चमक पुन्हा मिळवता येते. पॉलिश करण्यापूर्वी गाडी धुऊन आणि तिच्यावरील चिकट डाग हटवून घ्यावेत. त्यानंतर क्रीम पॉलिश लावावे. एका वेळी एका भागाचे पॉलिश करणे कधीही सोयीस्कर. क्रीम लावताना स्पंज गाडीच्या पृष्ठभागावर वक्राकार पद्धतीने फिरवावा लागतो. व्यवस्थित क्रीम लावल्यानंतर ती सुकू द्यावी व नंतर मऊ कपडय़ाने तो भाग पुसून घ्यावा.

संरक्षण :

शेवटची पायरी म्हणजे संरक्षण. गाडी नीट धुऊन कोरडी झाल्यावर, वॅक्स पॉलिशचा कोट लावा आणि चमकवा. वॅक्स पॉलिशवर पेंटवर्क तीन ते सहा महिन्यांसाठी संरक्षित राहील आणि जर हे चांगल्या दर्जाच्या पॉलिशसह असेल तर हे सहा महिने संरक्षित राहील. सिरेमिक कोटिंग, पीपीएफ आणि इतर अनेक पर्याय आहेत, परंतु वॅक्स पॉलिश हा सर्वात किफायतशीर मार्ग आहे, जो पेंटला अजिबात हानी पोहोचवत नाही.

Story img Loader