आपल्या इलेक्ट्रिक टू-व्हीलरची ‘Joy e-Bikes’ या ब्रँड नावाने बाजारात विक्री करणारी इलेक्ट्रिक टू-व्हीलर उत्पादक WardWizard Innovations & Mobility ने नुकतेच ऑटो एक्स्पोमध्ये आपली हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर ‘Joy Mihos’ लाँच केली होती. ही स्कूटर बनवण्यासाठी कंपनीने पॉली मटेरियल वापरले आहे. या मटेरियलच्या वापरामुळे स्कूटरला हातोड्याने जरी मार लागला तरी तिच्या बाॅडीला इजा होणार नाही, असा कंपनीचा दावा आहे. या स्कूटरला बाजारपेठेत प्रचंड मागणी आहे. १५ दिवसांतच या स्कूटरची बुकींग १८,६०० च्या वर गेली असून कंपनीने बुकींगचा नवा रेकॉर्डच बनविला आहे.

MIHOS इलेक्ट्रिक स्कूटर प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज

कंपनीच्या मते, याचा व्हीलबेस १३६०mm आहे. यामध्ये सर्व LED लाइटिंग सेटअप देण्यात आले आहेत. कंपनीने ही स्कूटर मेटॅलिक ब्लू, सॉलिड ब्लॅक ग्लॉसी, सॉलिड यलो ग्लॉसी आणि पर्ल व्हाईट या चार खास रंगांच्या निवडीमध्ये लाँच केली आहे. याशिवाय ड्रायव्हरच्या सुरक्षेचा विचार करून या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये प्रगत तंत्रज्ञान आणि वापरकर्त्यांसाठी अनुकूल वैशिष्ट्यांसह साउंड सिम्युलेटरही देण्यात आला आहे.

New 2025 Honda Dio Scooter Launched With Obd2b compliant And Advanced Features, See Price and details
Honda Dio Scooter: स्पोर्टी लूक, जास्तीचं मायलेज! नवीन ‘Dio’ स्कूटर लॉन्च, किंमत किती? जाणून घ्या डिटेल्स
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Flipkart Monumental Sale
Flipkart Monumental Sale: एक लाखाच्या आत खरेदी करा TVS ‘ही’ बाईक; सिंगल चार्जवर धावेल ‘इतके’ किमी
cab driver viral video
VIDEO : टॅक्सी चालकाला पोहोचायला ७ मिनिटांचा उशीर, महिलेने घातला राडा; चालकाच्या अंगावर थुंकत म्हणाली…
Most consumers eye EVs as next car charging gaps remain key concern: TCS study
इलेक्ट्रिक वाहनांबाबत ‘टीसीएस’ची महत्त्वपूर्ण भविष्यवाणी
cheapest electric car ligier mini ev could launch in 1 lakh rupees know features design battery details range
फक्त १ लाख रुपयात लॉंच होऊ शकते ‘ही’ इलेक्ट्रिक कार! सिंगल चार्जवर मिळेल १९२ किमीची रेंज
Mercedes Benz India sales news in marathi
भारतात गाड्यांच्या विक्रीत दोन लाखांचा टप्पा; मर्सिडीज बेंझचा ‘आलिशान’ वरचष्मा कायम 
Atal Setu , Atal Setu one year , Atal Setu Transport ,
वर्षभरात अटल सेतूवरुन धावली ८२ लाख ८१ हजार वाहने, सेतू वाहतूक सेवेत दाखल होऊन एक वर्षे पूर्ण

(हे ही वाचा : Royal Enfield Super Meteor 650 पेक्षाही जास्त आहे ‘या’ मारुतीच्या CNG कारचे मायलेज अन् फीचर्सही कमाल)

JOY MIHOS इलेक्ट्रिक स्कूटर वैशिष्ट्ये

या स्कूटरला रेट्रो स्टाइलिंग देण्यात आली आहे. तसेच यामध्ये रुंद आणि लांब आसनांचा वापर करण्यात आला आहे. ड्रायव्हरच्या सोयी लक्षात घेऊन, मागे मोनो रिव्हर्सिबल स्प्रिंग सस्पेंशनसह टेलिस्कोपिक सस्पेन्शन सेटअप देण्यात आला आहे. MIHOS ची रचना भारतीय रस्त्यांच्या परिस्थितीनुसार आणि १७५ मिमीच्या ग्राउंड क्लिअरन्ससह केली गेली आहे. या स्कूटरमध्ये साइड स्टँड सेन्सर आणि हायड्रॉलिक कॉम्बी ब्रेकिंग सिस्टम (CBS) देखील आहेत. यासोबतच रिव्हर्स मोड, जीपीएस ट्रॅकिंग सिस्टीम, अँटी थेफ्ट अलार्म सारखे फीचर्सही देण्यात आले आहेत.

एका चार्जमध्ये १०० किलोमीटरपर्यंतची रेंज

MIHOS स्कूटर एका चार्जवर १०० किलोमीटरपर्यंतचे अंतर कापण्यास सक्षम आहे. तसेच, ही स्कूटर ७ सेकंदांपेक्षा कमी वेळेत ०-४० किमी प्रतितास वेग मिळवू शकते. MIHOS मध्ये 74V40Ah Li-ion आधारित बॅटरी देण्यात आली आहे.

Joy Mihos किंमत

Joy Mihos इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 1.35 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून हे 999 रुपयांमध्ये बुक केले जाऊ शकते. पुढील महिन्यापासून त्याची डिलिव्हरी सुरू होईल, असेही कंपनीने म्हटले आहे. दुसऱ्या टप्प्याचे बुकिंग ९ फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे.

Story img Loader