Warivo CRX Electric Scooter Price Features: भारतात इलेक्ट्रिक टू व्हीलर्सचा बाजार दिवसेंदिवस मोठा होत चालला आहे. अनेक मोठ्या वाहन निर्मात्या कंपन्या इलेक्ट्रिक वाहनांसह मैदानात उतरत आहेत. आता देशात परवडणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी झपाट्याने वाढत आहे. नवनवीन मॉडेल्स सातत्याने लाँच होत आहेत. आता इलेक्ट्रिक स्कूटरची किंमतही पेट्रोल स्कूटरच्या बरोबरीने आली आहे. Ola, Ather, Bajaj आणि TVS सारख्या कंपन्यांनी त्यांच्या स्कूटरच्या किमती कमी केल्या आहेत. तुम्ही जर एखादी स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याच्या विचारात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आणखी एक स्वस्त हायस्पीड इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारपेठेत लाँच झाली आहे. होय, यावेळी Varivo Motor ने हायस्पीड इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये प्रथमच Varivo CRX लाँच केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Warivo CRX कलर ऑप्शन पाहा

व्हॅरिवो CRX 5 आकर्षक कलर ऑप्शनमध्ये ऑफर केले आहे, जे पॉपी रेड, विंटर व्हाइट, लक्स ग्रे, ऑक्सफर्ड ब्लू आणि रेवेन ब्लॅक आहेत. त्याची विक्री लवकरच सुरू होणार आहे.

Warivo CRX: फीचर्स

व्हॅरिवो CRX च्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात रंगीत डिस्प्ले आहे, जो बॅटरी स्थिती, रेंज, स्पीडोमीटर, ओडोमीटर, राइडिंग मोडसह अनेक फीचर्स देतो. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये ४२ लिटरच्या खाली सीट स्टोरेज स्पेस आहे, ज्यामध्ये प्रत्येकी दोन हेल्मेट ठेवण्याची जागा असेल आणि बॅग ठेवण्यासाठी जागा आहे. याशिवाय यात मोबाइल चार्जिंग पॉइंट (टाइप-सी आणि यूएसबी), १५० किलो लोडिंग क्षमतेसह इतर अनेक फीचर्स आहेत.

Warivo CRX: किंमत काय

Varivo CRX ची किंमत फक्त ७९,९९९ रुपये आहे. या स्कूटरमध्ये एक मोठी आणि कंफर्ट सीट आणि USB-Type C चार्जिंग पोर्ट तसेच ४२ लिटरच्या सीटखाली स्टोरेज स्पेस यांसारखी फीचर्स आहेत.

हेही वाचा >> Royal Enfield ला टक्कर देण्यासाठी येतेय ‘ही’ नवीन बाईक, जबरदस्त लूक, ३३४ सीसी इंजिन अन्…; जाणून घ्या किंमत, फीचर्स

इलेक्ट्रिक स्कूटरला लागणाऱ्या आगीच्या घटनांमुळे ग्राहकांमध्ये काहीसं संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय. मात्र, आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरची आणि बॅटरीची योग्य निगा राखली, वेळोवेळी तपासणी केली, सर्व्हिसिंगची कामं केली, तर अशा घटना टाळता येणं शक्य असल्याचं एक्स्पर्टचं म्हणणं आहे. त्यामुळे तुम्हीही इलेक्ट्रिक स्कूटर वापरत असाल अथवा विकत घेणार असाल, तर इलेक्ट्रिक स्कूटर वापरताना योग्य ती काळजी घ्या आणि तुमच्या बाईकची वेळोवेळी निगा राखा.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Warivo crx electric scooter price feature high speed electric scooter warivo crx at 79999 rupees and 90 km real world range see features srk