भारतीय लोकांनी केलेल्या जुगाडांची चर्चा केवळ फक्त देशातच नव्हे तर परदेशातही सुरूच असते. भारतीय लोकांच्या या टॅलेंटशी कोणीही स्पर्धा करू शकत नाही असे म्हटले जाते. अशाच बंगालमधील एका जुगाडाची चर्च देशभर सुरु आहे. त्या व्यक्तीने पेट्रोलच्या वाढत्या किंमतीना कंटाळून आपली Tata Nano कार सौरऊर्जेवर चालणाऱ्या कारमध्ये बदलली आहे. सध्या या व्यक्तीने केलेल्या जुगाडाची चर्चा सोशल मीडिया आणि न्यूज चॅनेल्सवर सुरु आहे. याने केलेल्या नाविन्यपूर्ण जुगाडाचे लोकांकडून कौतुकही करण्यात येत आहे.
पेट्रोलच्या वाढत्या किंमतीमुळे आपल्या टाटा नॅनोचे रूपांतर सौर उर्जेवर चालणाऱ्या गाडीमध्ये केले आहे. हा व्यक्ती पश्चिम बंगालच्या बांकुरा जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याचे नाव मनोजीत मंडल असे आहे. तो एक व्यावसायिक आहे. सौरऊर्जेवर रूपांतरित केल्यामुळे या व्यक्तीची गाडी बिना इंजिनची देखील रस्त्यावर धावू शकते. याबाबतचे वृत्त बिझनेस टूडेने दिले आहे.
मनोजित मंडल असे या व्यक्तीचे नाव असून त्यांनी आपली पेट्रोल नॅनो कार सोलर कारमध्ये बददली आहे. कारचा लुक बदलल्यामुळे ही कार खूपच स्वस्त दिसते. मनोजीत मंडल यांच्या म्हणण्यानुसार त्यांची कार ३० ते ३५ रुपयांमध्ये १०० किलोमीटर आरामात धावू शकते. मनोजित मंडल यांनी त्यांच्या कारवर ‘नो पेट्रोल, सोलर कार… द कार ऑफ फ्युचर’ असे लिहिले आहे. याच कारणामुळे ते जेव्हा गाडी घेऊन रस्त्यावर चालवतात तेव्हा लोक त्यांच्या कारचे कौतुक करतात.
पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे मनोजीत मंडल यांना ही अभिनव कल्पना सुचली. मनोजित मंडल यांची ही टाटा नॅनो कार इंजिन,आवाजविना आणि पेट्रोलशिवाय रस्त्यावर धावताना दिसते. यातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या नॅनोची गिअर सिस्टीम देखील खूप ताकदवान आहे. जी आवाज न करता ८०KMPH इतका स्पीडमध्ये धावू शकते.