देशभरामध्ये फोर व्हीलर , टू-व्हीलर खरेदी करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामध्ये सीएनजी, इलेक्ट्रिक आशा वाहनांचा समावेश आहे. तसेच टू -व्हीलर किंवा फोर व्हीलर चालवण्यासाठी आपल्याला ती कशी चालवायची ते शिकावे लागते. म्हणजे आपण यासाठी कार चालवायला शिकण्यासाठी क्लासेस लावतो. प्रशिक्षण घेतो. तेव्हा जे नवीन ड्रायव्हर्स आहेत त्यांना काही गोष्टींची कल्पना यायला वेळ लागतो. गाडी चालवताना कोणकोणते नियम पाळले पाहिजेत ही समजून घेणे आणि गाडी चालवत असताना त्याचा अंमल करणे आवश्यक असते. नवीन गाडी शिकणाऱ्या किंवा शिकलेल्या लोकांनी कोणकोणते नियम लक्षात घेणे आवश्यक आहे ते पाहुयात.

वाहतूक नियमांचे पालन करणे

तुमच्या आणि इतरांच्या सुरक्षेसाठी नवीन गाडी शिकलेल्या लोकांनी गाडी चालवताना वेग मर्यादा, सिग्नल्स, लेन मार्किंग या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

Nagpur, Thieves stole donation box Mahal,
साक्षात ‘विघ्नहर्ता’ मंडपात, तरीही चोरट्यांनी साधला डाव
21st September Rashi Bhavishya & Marathi Panchang
२१ सप्टेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थीला बाप्पा करणार ‘या’…
Pimpri, Notice to Engineers, Road Repair Works pimpri,
पिंपरी : रस्ते दुरुस्तीच्या कामांवर देखरेख ठेवणाऱ्या अभियंत्यांना नोटीस; काय आहे कारण?
pukar seva pratishthan ngo for destitute elderly homeless
रस्त्यावरील निराधार वृद्ध रुग्णांवर उपचार करणारा ‘सेवाव्रती’!
construction houses mangroves, state government,
खारफुटीवर घरे बांधल्याच्या तक्रारीच्या तपासणीचे राज्य सरकारला आदेश
Loksatta career mantra Science Engineer UPSC Guidance
करिअर मंत्र
Police patrol J J Hospital, Mumbai,
मुंबई : डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी जे.जे. रुग्णालयात पोलीस घालणार गस्त
nagpur, Dharampeth, pub license, drug abuse, noise disturbance, Nagpur pub, residential area, Shankarnagar, Ramnagar, political influence, police action, Nagpur news,
नागपूर : धरमपेठ ‘रस्त्या’वरील वादग्रस्त पबचा परवाना रद्द करा, त्रस्त नागरिकांची उपमुख्यमंत्र्यांकडे धाव

हेही वाचा : Castrol इंडियाने लॉन्च केले ‘हे’ ऑटो केअर प्रॉडक्ट्स, जाणून घ्या कशाचा आहे समावेश

सभोवताली लक्ष ठेवणे

रस्त्यावर गाडी चालवत असताना इतर वाहने, बाजूने चालणारे पादचारी यांच्याबद्दल सावधान राहणे आवश्यक आहे. त्यासाठी तुमच्या गाडीमध्ये असलेल्या मिररचा वापर तुम्ही केला पाहिजे. गाडी चालवत असताना सावध राहून पुढे कोणता अडथळा तर येत नाही आणि आला तर काय करावे लागेल यासाठी कायम अलर्ट असले पाहिजे.

इंडिकेटरचा वापर करावा

जर का तुम्ही शहरांमध्ये , हायवेवर किंवा कोणत्याही ठिकाणी गाडी चालवत असाल आणि तुम्हाला लेन बदल्याची असल्यास तुम्ही इंडिकेटरचा वापर केला पाहिजे. म्हणजेच सर जात असताना तुम्हाला उजव्या दिशेला वळायचे असल्यास वळण्याच्या आधी काही वेळ उजव्या बाजूचा इंडिकेटर द्यावा. जेणेकरून मागून, पुढून येणारी गाडी सावध होईल. त्यामुळे अपघात टाळण्यास मदत होईल.

हेही वाचा : Petrol-Diesel Price on 13 May: राज्यातील कोणत्या शहरात पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त? पाहा आजचे नवे दर

दोन वाहनांमध्ये योग्य अंतर राखावे

रस्त्यावर गाडी चालवत असताना तुमच्या आणि पुढे असणाऱ्या वाहनामध्ये सुरक्षित अंतर असणे गरजेचे आहे. जर अंतर कमी असेल तर पुढच्या गाडीने अचानक ब्रेक दाबल्यास तुमची गाडी समोरच्या गाडीवर आढळण्याची शक्यता असते. त्यामुळे ठराविक अंतर असल्यास तुम्हाला सुद्धा तुमची गाडी कंट्रोल करण्यास वेळ मिळू शकतो.

तुम्ही जसे जसे गाडी चालवायला लागाल , तसा तुम्हाला चांगला अनुभव मिळेल. अनेक गोष्टी शिकायला मिळतील. तसेच अनुभव, ड्रायव्हिंग क्लास आणि वाहतुकीचे नियम यामुळे तुम्हला तुमचे ड्रायव्हिंग स्किल्स सुधारण्यास मदत होईल. तसेच वेगवगेळ्या रस्त्यांची परिस्थिती, हवामान आणि ट्रॅफिक याच्याशी जुळवून घेणे सोपे होईल. गाडी चालवत असताना सुरक्षितपणे ड्रायव्हिंग करणे ही एक जबाबदारी असते. ती केवळ स्वतःचेच नवे तर इतरांचे देखील संरक्षण करते. वरील सर्व नियमांचे पालन करू तुम्ही सुरक्षित आणि ड्रायव्हिंगचा आनंद घेऊ शकता.