Car Tips: अनेकांचे आपल्या गाडीवर जीवापाड प्रेम असते. कित्येकांना आपल्या कार किंवा बाईकला एखादा स्क्रॅच पडलेलाही आवडत नाही. त्यामुळे कार खरेदी करण्यासोबतच ती चांगल्या स्थितीत ठेवणे हीदेखील मोठी जबाबदारी असते. त्यात पावसाळ्यात गाडीची खूप काळजी घ्यावी लागते. कारण- या दिवसांत पावसामुळे भिजल्याने गाडीला गंज लागण्याची दाट शक्यता असते. कारला गंज लागल्यावर ती खूप खराब दिसते. त्याशिवाय गंज लागल्यामुळे कारची रचनाही बिघडते. त्यामुळे कारला गंज लागू नये म्हणून काय करावे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

कारला गंज कसा लागतो?

कारच्या स्टीलच्या बॉडीला गंज लागण्याची दाट शक्यता असते. जेव्हा लोखंडापासून बनविलेल्या वस्तू ऑक्सिजन आणि आर्द्रता या दोन्हींच्या संपर्कात येतात तेव्हा कोणत्याही स्टीलवर गंज येतो. पावसाळ्यात हवामानात भरपूर ओलावा असतो आणि त्यामुळे गाडीला गंज लागू शकतो.

रस्ट प्रूफिंग गरजेचे आहे का?

कारला गंज लागण्यापासून वाचविण्यासाठी रस्ट प्रूफिंग आवश्यक आहे की नाही? हे तुम्ही किती वेळ कार वापरणार आहात यावर अवलंबून असते. जर तुम्ही वॉरंटी कालावधीपेक्षा जास्त काळ कार वापरणार असाल, तर रस्ट प्रूफिंग करून घेणे गरजेचे आहे. त्यासोबतच तुमच्या कारच्या आजूबाजूचे हवामान लक्षात घेऊन रस्ट प्रूफिंग करायला हवे. हवामानात जितकी जास्त आर्द्रता असते, तितकी कारला गंज लागण्याची दाट शक्यता असते.

कारला गंज लागू नये म्हणून काय करावे?

कार नियमित स्वच्छ करा

गाडी सतत स्वच्छ केल्याने गाडीवरील घाण साफ करणे शक्य होते. वाहनाच्या खालच्या भागाला गंज लागण्याची दाट शक्यता असते. पावसाळ्यात रस्त्यावरील चिखल गाडीच्या अनेक भागांना चिकटतो आणि तेथे गंज लागतो. म्हणून कार नेहमी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा.

स्प्रे वापरा

कार स्वच्छ करण्यासाठी स्प्रेचा वापर करा. त्यामुळे पाण्याचा वापर कमी होईल आणि नंतर कापडाने कार साफ करा. त्यामुळे गंज लागण्याचा धोका कमी होईल.

हेही वाचा: प्रवासादरम्यान सतत बाईक बंद पडतेय? लगेच तपासा या गोष्टी आणि फॉलो करा ‘या’ टिप्स

स्क्रॅचपासून वाचवा

कार चालविताना बऱ्याचदा स्क्रॅच पडतात. अनेकदा स्क्रॅचकडे लोक दुर्लक्ष करतात. पावसाळ्यात या स्क्रॅचमुळेही गाडीला गंज लागण्याचा धोका वाढतो. तो टाळण्यासाठी टच-अप किंवा पेंट वापरावे.

गंज लागल्यावर काय कराल?

कारला गंज लागला असेल, तर तो तत्काळ काढून टाका. कारच्या पृष्ठभागावरील गंज प्रायमर, कोटिंग व पेंटिंग यांद्वारे काढून टाकता येऊ शकतो.

Story img Loader