What is CC: जेव्हा आपण बाईक किंवा कारच्या इंजिन क्षमतेबद्दल बोलतो तेव्हा आपण आपोआप CC हा शब्द वापरतो. पण, हे सीसी म्हणजे काय आणि त्यात इंजिनची क्षमता कशी मोजली जाते हे आपल्यापैकी फार कमी जणांना माहीत आहे. जेव्हा कार किंवा बाईक घेण्यासाठी शोरूममध्ये जातो तेव्हा सांगितले जाते की, या वाहनाचे इंजिन १०० सीसी, १५० सीसी किंवा ३५० सीसी आहे. वास्तविक, याद्वारे त्या वाहनाच्या इंजिनची क्षमता दर्शविली जाते. यामुळे दुचाकी किंवा कार खरेदी करताना अनेक लोकांचा गोंधळ उडतो. कारण ते कमी किंवा जास्त असल्यास, ते वाहनाच्या मायलेज आणि कामगिरीसह किंमतीवर परिणाम करते. या तांत्रिक भाषेत कोणती बाईक आणि कोणती कार इतकी पॉवरफुल आहे हे कसे समजायचे? ज्या बाईक किंवा कारचे इंजिन जास्त CC असेल, ते जास्त पॉवरफुल असेल का? चला तर समजून घेऊया सविस्तर…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

CC म्हणजे काय?

कोणत्याही कार किंवा बाईकची क्यूबिक कॅपॅसिटी (CC) म्हणजे कार किंवा बाइकचे इंजिन किती पॉवर देते. क्यूबिक कॅपॅसिटी म्हणजे बाईकच्या इंजिनच्या चेंबरचा वॉल्यूम होय. जितकी जास्त क्षमता असते, पॉवर उत्पन्न करण्यासाठी कॉम्प्रेस्ड हवा आणि इंधन मिश्रणाचे प्रमाण तितके जास्त असते. CC म्हणजे क्यूबिक कॅपेसिटी. हे त्या वाहनाच्या इंजिनचे जास्तीत जास्त पॉवर आउटपुट दर्शवते. इंजिन चेंबरच्या क्यूबिक सेंटीमीटर मापनास CC म्हणतात. इंजिनमध्ये जेवढे सीसी, तेवढीच एका वेळी निर्माण होणारी ऊर्जा जास्त.

(हे ही वाचा : कारच्या Average अन् Mileage मध्ये काय फरक असतो माहितेय का? समजून घ्या यामागील अंतर )

कामगिरीवर होतो परिणाम

क्यूबिक क्षमता (CC) देखील वाहनाच्या कार्यक्षमतेवर परिणाम करते. तसेच, इंजिन किती इंधन वापरते आणि ते किती पॉवर आणि टॉर्क तयार करते हे देखील इंजिनच्या सीसीवर अवलंबून असते. बहुतेक बाईक्स ९० सीसी ते ११० सीसी इंजिन वापरतात. अशा बाईक्स दैनंदिन गरजांसाठी बनवल्या जातात. दुसरीकडे, स्पोर्ट्स बाईकसाठी अधिक शक्तिशाली इंजिन आवश्यक आहे (३५०cc ते ६५०cc दरम्यान).

कोणत्या सीसीची बाईक घेणे योग्य?

कोणतीही बाईक निवडण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या गरजा समजून घ्याव्या लागतील. जर तुम्ही सपाट मैदानात राहत असाल आणि सामान्य वापरासाठी बाईक हवी असेल, तर कमी सीसी बाईक तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. पण, जर तुम्हाला हाय परफॉर्मन्स बाईक हवी असेल किंवा डोंगराळ भागात राहायचे असेल, तर तुम्हाला शक्तिशाली इंजिन आणि जास्त पॉवर असलेली बाईक लागेल. अशा परिस्थितीत तुम्ही जास्त सीसी असलेली बाईक निवडू शकता.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What does the cylinder capacity cc mean in a bike and how it affects pdb
Show comments