Best Cars for Indian Roads According to ChatGPT: आर्टिफिशियल इंटेलिजन्स रिसर्च स्टार्टअप ओपन एआयने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये एआय चॅटबॉट चॅटजीपीटी लाँच केले. आता चॅटबॉट सतत चर्चेत आहे. कारण, हे कोणत्याही विषयावर संपूर्ण मजकूर तयार करू शकते. अनेक तज्ञांचा असा दावा आहे की, हा चॅटबॉट लोकांना मदत करण्यात गुगललाही मागे टाकू शकतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि इंटरनेटवर सापडलेल्या डेटाच्या मदतीने ते लोकांच्या सर्व प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे देत आहे. आता या चॅटबॉटने भारतीय रस्त्यांसाठी सर्वोत्तम कार कोणती असेल, हे सुचवलं आहे.
भारतासाठी कोणती कार सर्वोत्कृष्ट असेल असे विचारले असता, चॅटबॉट ChatGPT ने कोणत्याही कार ब्रँड आणि मॉडेलचे नाव न घेता त्या कारचे तपशील दिले. चॅटबॉटने कारची सर्व वैशिष्ट्ये सांगितली जी भारतीय रस्त्यावरून जाणाऱ्या कारमध्ये असली पाहिजेत.
(हे ही वाचा : स्वप्न होणार पूर्ण! ‘या’ दोन कारवर मिळतोय तब्बल २ लाखांचा डिस्काउंट, ऑफरचे केवळ दोनच दिवस बाकी )
ChatGPT ने सांगितले कोणती कार असेल बेस्ट
- कारच्या पहिल्या वैशिष्ट्याबद्दल बोलताना, ChatGPT ने सांगितले की, जर कार भारतीय रस्त्यावर धावणार असेल तर तिला अधिक ग्राउंड क्लीयरन्स असणे आवश्यक आहे. ChatGPT ने नमूद केले आहे की किमान १७० मिमी ग्राउंड क्लीयरन्स असलेली कार भारतीय रस्त्यांच्या परिस्थितीसाठी सर्वात योग्य असेल. ग्राउंड क्लीयरन्स यापेक्षा कमी असल्यास, कारचा खालचा भाग रस्त्यावर घासण्याची शक्यता असते.
- याशिवाय, चॅटजीपीटीने असेही म्हटले आहे की, भारतीय रस्त्यांवर बरेच खड्डे आहेत. हे टाळण्यासाठी कारची सस्पेन्शन सिस्टीमही चांगली असावी जी हादरे सहन करू शकेल. तसेच भारतात कारचे मायलेज खूप महत्त्वाचे आहे आणि आजकाल इंधनाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. अशा परिस्थितीत, कारचे मायलेज चांगले असावे.
- ChatGPT पुढे म्हणाले की, भारतीय रस्ते खूप गर्दीचे आहेत आणि लोकांना पार्किंगची समस्या देखील भेडसावते. अशा परिस्थितीत कॉम्पॅक्ट किंवा लहान आकाराची कार सर्वोत्तम ठरेल. चॅटजीपीटीने भारतातील उष्ण आणि दमट हवामान पाहता कारमध्ये एअर कंडिशनिंग असणे आवश्यक असल्याचे सांगितले, जेणेकरून उन्हाळ्यात कारमधून प्रवास करणे आरामदायी होऊ शकेल.
(हे ही वाचा : Bullet घ्यायचा विचार करताय? अवघ्या ५० हजारात खरेदी करा ‘ही’ Royal Enfield, अन् करा पैशांची बचत )
- याशिवाय चॅटजीपीटीने असेही सांगितले की एअरबॅग्ज, डिस्क ब्रेक्स, एबीएस सारखी मूलभूत सुरक्षा उपकरणे सर्व वैशिष्ट्ये असावीत. याशिवाय गाडीची बिल्ड क्वालिटीही चांगली असायला हवी जेणेकरून अपघातादरम्यान प्रवाशांनाही सुरक्षित ठेवता येईल.
- शेवटी, ChatGPT ने असेही निदर्शनास आणले की, भारतातील लोक परवडणाऱ्या कार खरेदी करण्यास प्राधान्य देतात. म्हणूनच उत्तम कार ती असेल जी भारतातील सामान्य जनतेच्या बजेटमध्ये असेल, असेही सांगितले आहे.