Best time to change car engine oil: जर तुमच्याकडे कार असेल तर तुम्हाला माहित असले पाहिजे की त्याचे इंजिन ऑइल किती वेळा बदलावे. कारचे इंजिन ऑइल योग्य वेळी बदलले नाही तर त्याचा कारच्या इंजिनवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. अनेक वेळा गाडीतील समस्यां वाढतच राहतात आणि त्या कधीच थांबत नाहीत आणि त्यामागचं नेमकं कारण काय हेदेखील तुम्हाला कळत नसतं. जर तुम्ही अजूनही तुमच्या कारचे इंजिन ऑइल बदलण्यात निष्काळजीपणा असाल तर आज या लेखातून आम्ही तुम्हाला ते बदलण्याची योग्य वेळ सांगणार आहोत.

कार निर्मात्याच्या शिफारसी वाचा

इंजिन ऑइल किती किलोमीटर किंवा वेळेनंतर बदलले पाहिजे हे कार मालकाच्या मॅन्युअलमध्ये नमूद केले जाते. याचा कालावधी सहसा ५,००० ते १०,००० किलोमीटर किंवा ६ महिने ते १ वर्षाच्या आत असतो.

Driving on Indian roads learn how to drive in traffic to become better driver follow tips ABCD method
तुम्हाला अगदी ‘प्रो’ सारखी कार चालवायचीय? मग भारतीय रस्त्यांवर गाडी चालवण्याची ‘ABCD’ शिकूनच घ्या; बेस्ट ड्रायव्हर होण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Kia Syros SUV price features
KIA च्या ‘या’ कारची लाँच आधीच बुकिंग सुरू; नेमकी इतकी मागणी का? फीचर्स काय आहेत, जाणून घ्या
Follow the tips to look like an old car as shiny like a new car
जुनी कार नव्यासारखी चकचकीत दिसण्यासाठी ‘या’ टिप्स करा फॉलो
Bike Driving Tips
Bike Driving Tips : जर प्रत्येक दुचाकी चालकाने ‘या’ पाच सवयी लावल्या तर कधीही होणार नाही अपघात
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Shark Tank Season 4 judges are well known in the country and here are the cars they own
BMW ते Mercedes-Benz पर्यंत… शार्क टँकचे १० शार्क्स या आलिशान कारचे आहेत शौकीन? वाचा कोणाकडे आहे कोणती कार?
Manoj Jarange Patil Nomination Back Decision Impact on Eknath Shinde Shivsena
Manoj Jarange Patil : माघार घेताना जरांगे यांचा मुख्यमंत्री शिंदे यांना धक्का

ड्रायव्हिंगच्या परिस्थितीवर अवलंबून

सामान्य स्थिती: जर तुम्ही सामान्य शहरात गाडी चालवत असाल तर नियमानुसार ऑइल बदला.

कठीण परिस्थिती: जर तुम्ही खूप धुळीने भरलेल्या भागात, डोंगराळ भागात किंवा जड रहदारीच्या ठिकाणी गाडी चालवत असाल, तर ऑइल लवकर बदलावे लागेल.

ऑइलच्या प्रकारावर अवलंबून

मिनरल ऑइल: ते दर ५,००० किलोमीटरवर बदलले पाहिजे.

सिंथेटिक ऑइल: ते दर ७,५०० ते १०,००० किलोमीटर अंतरावर बदलले जाऊ शकते.

सावधगिरीची चिन्हे

खालील लक्षणे दिसल्यास इंजिन ऑइल लवकर बदला:

ऑइलचा रंग काळा किंवा घट्ट झाला आहे.

इंजिनमधून जास्त आवाज येत आहे.

इंधन कार्यक्षमतेत घट झाली आहे.

ही चूक करते लगेच टाळा

जर तुम्ही ऑइल बदलण्यास उशीर केला, तर त्यामुळे इंजिनवर अधिक घर्षण होईल आणि इंजिन खराब होऊ शकते. यामुळे मोठा खर्चही होऊ शकतो. तुमच्या SUV साठी, तुम्ही मॅन्युअलमध्ये दिलेल्या वेळेचे पालन केल्याचे सुनिश्चित करा आणि कठोर परिस्थितीत ऑइल लवकर बदलून घ्या.

Story img Loader