Difference Between Average and Mileage: पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे सध्या ग्राहकही पैसा वसूल मायलेज देणाऱ्या वाहनांचा पर्याय शोधत आहेत. प्रत्येक गाडीचा एव्हरेज आणि मायलेज हा वेगवेगळा असतो. आणि बरेच लोकांचा या दोन गोष्टींमध्ये गोंधळ होतो, की एव्हरेज कशाला म्हणतात आणि मायलेज कशाला म्हणतात, माहितेय का, चला तर आज आम्ही तुमचा हा गोंधळ दूर करणार आहोत.

मायलेज (Mileage)

एखादे वाहन एक लिटर इंधनात जितके किलोमिटर अंतर कापेल त्या अंतराला त्या वाहनाचे मायलेज म्हणतात . हे बऱ्याच नव्या वाहनांमध्ये MID वर इन्स्टंट दिसते. हे मायलेज प्रत्येक वेळेला एक सारखंच असू शकत नाही . इतर बाह्य घटक जसे, हेवी ट्रॅफिक, खड्डेयुक्त रस्ते, वाहनात असलेल्या सामानाचे प्रवाशांचे वजन, किंवा चढणीचा वा उतरणीचा घाट रस्ता, ड्रायव्हरची चांगली वा वाईट ड्रायव्हिंग स्टाईल, वाहनात असलेला तांत्रिक बिघाड, टायर प्रेशर इत्यादी इत्यादी अश्या अनेक कारणांमुळे एखाद्या वाहनाची फ्युअल इकॉनॉमी म्हणजेच मायलेज नेहमी कमी जास्त बदलत असते. जर गाडीचा मायलेज मोजायचा असेल तर दोन प्रकारे मोजल्या जाते, पहिला शहरात आणि दुसरा महामार्गावर आणि शहराच्या तुलनेत महामार्गावर नेहमी जास्तच मायलेज निघतो.

(हे ही वाचा : टाटाच्या ‘या’ कारनं ह्युंदाई-महिंद्राच्या सगळ्या गाड्यांना पछाडलं, खरेदीसाठी हजारो ग्राहकांच्या रांगा, किंमत फक्त…)

एव्हरेज (Average)

विना कोणत्या नियम आणि अटीं शिवाय गाडीने डिझेल किंवा पेट्रोल च्या प्रमाणात किती अंतर पार केले त्याला गाडीचा एव्हरेज म्हणतात. जेव्हा आपण एखादे वाहन खरेदी करतो आणि आपल्या शहरातील रस्त्यांच्या परिस्थितीनुसार ते चालवितो, तेव्हा प्रति युनिट इंधनाच्या अंतराला त्या वाहनाचा एव्हरेज म्हणतात. सरासरी मोजण्यासाठी, इंधन टाकी भरा आणि तुमच्या वाहनाचे ओडोमीटर शून्यावर रीसेट करा. टाकी रिकामी झाल्यावर ओडोमीटरचे रीडिंग घ्या आणि त्याला तुमच्या वाहनाच्या इंधन टाकीच्या क्षमतेने विभाजित करा आणि त्यानंतर जो परिणाम येईल, तो तुमच्या वाहनाची सरासरी असेल.

Story img Loader