AWD vs 4WD: What’s the Difference: कार खरेदी करणे हे प्रत्येक सामान्य माणसाचे एक स्वप्न असते. यासाठी लोक कठोर परिश्रम करतात आणि पैसे वाचवतात. नवीन कार घरी आणण्यासाठी खूप वेळ आणि मेहनत तसेच मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी लागते. आयुष्यातील पहिली कार ही प्रत्येकासाठीच विशेष असते. प्रत्येकाची एक ड्रीम कार असते. ती कार घेण्याइतके पैसे जमल्यानंतर लोक कार खरेदी करतात. नवीन कार खरेदी करताना लोकं कारचा रंग, डिझाईन, फीचर्स, किंमत, कारची सुरक्षा वैशिष्ट्ये, मायलेज, इंजिन इत्यादींबाबींकडे लक्ष देत असतात.
भारतीय ऑटो बाजारात अनेक कंपन्यांच्या कार सध्या उपलब्ध आहेत. आजच्या काळात, तुम्ही कारमधील ऑल-व्हील ड्राइव्ह सिस्टम आणि 4-व्हील ड्राइव्ह सिस्टमबद्दल ऐकले असेल. पण ऑल-व्हील ड्राइव्ह आणि फोर-व्हील ड्राइव्ह नेमकं आहे तरी काय, तुम्हाला माहिती आहे का? ऑल व्हील ड्राईव्ह किंवा फोर व्हील ड्राईव्ह वाहने कशी ओळखायची? या दोन्ही प्रकारामध्ये नेमका काय फरक आहे? आपल्यासाठी कोणते प्रकार सुरक्षित आहे? याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. ऑल व्हील ड्राईव्ह आणि फोर व्हील ड्राईव्हबद्दल लोकं अनेकदा गोंधळलेले असतात. बऱ्याच लोकांना असे वाटते की, दोन्ही समान आहेत. त्यामुळे त्यांना नवीन कार खरेदी करताना जादा पैसे मोजावे लागतात. त्यामुळे आज आम्ही या माहितीच्या माध्यमातून तुमचा संभ्रम दूर करणार आहोत.
ऑल-व्हील ड्राईव्ह (AWD) आणि फोर-व्हील ड्राइव्ह (4WD) एकच गोष्ट सांगण्याचे दोन मार्ग वाटू शकतात, बरोबर? पण तसे अजिबात नाही. दोन्ही प्रणाली वाहनाच्या चारही चाकांना उर्जा प्रदान करतात, परंतु प्रत्येक प्रणाली ती शक्ती कशी वितरित करते त्यामध्ये भिन्नता आहे. कसं ते जाणून घ्या.
ऑल-व्हील ड्राइव्ह म्हणजे काय? (AWD)
ऑल-व्हील ड्राइव्ह सिस्टीमचे काम वाहनाच्या सर्व चाकांना वीज पोहोचवणे आहे. ऑल-व्हील ड्राइव्ह सिस्टीम गाडीच्या चारही चाकांना ऊर्जा निर्माण करते. AWD सिस्टममध्ये तुमच्याकडे पूर्ण वेळ AWD किंवा अर्धा AWD असतो. पूर्ण AWD मध्ये, पुढच्या आणि मागील दोन्ही चाकांना नेहमी पॉवर दिली जाते. परंतु अर्ध्या AWD मध्ये, एकतर पुढच्या किंवा मागील चाकांना नेहमी पॉवर वितरित केली जाते. हे लक्षात ठेवा की, दोन्ही प्रकारच्या AWD सह, वाहनाच्या सर्व टायर्सना वितरित केलेल्या पॉवरवर चालकाचे नियंत्रण नसते. AWD ही पूर्णपणे कंप्यूटराइज्ड सिस्टम आहे. ही सेन्सरवर चालणारी सिस्टम गरजेनुसार चारही चाकांना ओपोआप वीज पुरवते.
(हे ही वाचा : इथेनॉलवर चालणारी गाडी तुम्ही पाहिलीत का? कारसाठी खर्च किती? पर्यावरणपूरक आहे का? जाणून घ्या… )
फोर-व्हील ड्राइव्ह म्हणजे काय? (4WD)
फोर-व्हील-ड्राइव्हला 4X4 असेही म्हणतात. 4-व्हील ड्राइव्ह तुमच्या कारच्या चारही चाकांना ऊर्जा प्रदान करते. 4-व्हील ड्राइव्ह सिस्टीममध्ये, वाहनाच्या सर्व टायरमध्ये एकसारखी शक्ती जाते. जेवढी शक्ती पुढच्या चाकाला जाते तेवढीच शक्ती मागच्या चाकालाही जाते. या ड्राइव्ह सिस्टीममध्ये तुम्हाला पूर्ण वेळ आणि हाफ टाईम फोर व्हील ड्राइव्हचा पर्याय निवडण्याची संधी नाही. तुमच्या माहितीसाठी, 4WD सिस्टममध्ये सामान्यतः दोन मोड असतात, ज्यामध्ये कमी-श्रेणी आणि उच्च-श्रेणीचा समावेश होतो. रस्त्यांनुसार तुम्ही हे मोड निवडू शकता. त्यामुळे गरजेनुसार, आपण गुळगुळीत रस्त्यावर कमी श्रेणीचा आणि आॅफ रोडिंग, वाळू पाणी इत्यादी खराब रस्त्यांवर उच्च रेंजचा वापर करु शकतो. फोर व्हील ड्राइव्ह सिस्टम मॅन्युअल नियंत्रणासह येते. यामध्ये बटण वापरुन कोणत्या टायरला पाॅवर मिळेल, हे चालक ठरवू शकतो. याशिवाय ही सिस्टीम चालकाद्वारे नियंत्रित केली जाते. तर ऑल व्हील ड्राइव्ह सिस्टीम स्वयंचलितपणे कार्य करते.
ऑल व्हील ड्राइव्ह AWD आणि फोर व्हील ड्राइव्ह 4WD मध्ये फरक काय ?
ऑल-व्हील ड्राइव्ह आणि फोर-व्हील ड्राइव्ह हे शब्द गोंधळात टाकणारे असू शकतात कारण त्यांचा अर्थ एकच आहे. सर्व चार चाके चालवणे. मात्र, त्यांच्या कामाच्या पद्धतीत फरक आहे. वास्तविक, AWD किंवा ऑल व्हील ड्राइव्हचा वापर वाहनाची चारही चाके एकाच वेळी चालवण्यासाठी (एकाच वेळी जोर लावण्यासाठी) केला जातो. तर 4WD मध्ये, ड्रायव्हर 2WD (टू व्हील ड्राइव्ह) प्रणालीवर चालणाऱ्या वाहनाच्या यांत्रिक प्रणालीद्वारे सर्व चार चाके एकाच वेळी चालविण्याची निवड करतो. फोर-व्हील-ड्राइव्हमध्ये इंजिनची शक्ती चारही चाकांना जाते. हे सहसा ऑफ-रोडिंगसाठी बनविलेल्या कारमध्ये दिले जाते. या ड्राइव्हचे वैशिष्ट्य म्हणजे ड्रायव्हिंगच्या परिस्थितीनुसार ड्रायव्हर टू-व्हील आणि फोर-व्हील ड्राइव्हमध्ये मॅन्युअली स्विच करू शकतो. 4-व्हील ड्राइव्ह कार या ऑल व्हील ड्राइव्ह कारपेक्षा महाग असतात. 4-व्हील ड्राइव्ह सिस्टीम मोठ्या आकाराच्या एसयूव्ही वाहनांमध्ये दिले जाते.
ऑल व्हील ड्राइव्हचे फायदे आणि तोटे
फायदे: ऑल-व्हील ड्राइव्ह ही एक स्वयंचलित प्रणाली आहे, जिथे कोणत्या चाकाला अधिक शक्ती द्यायची हे ठरवण्यासाठी ड्रायव्हर पूर्णपणे मुक्त आहे. ऑल व्हील ड्राइव्ह सिस्टीम वाहनाच्या सर्व टायर्सना पॉवर प्रदान करते, ज्यामुळे टायर्सचा ट्रैक्शन मजबूत राहतो. टॉर्क पुरवठा हाताळण्यासाठी ऑल व्हील ड्राइव्ह सर्वोत्तम मानली जाते. त्यामुळे, तुम्हाला स्पोर्ट्स कारमध्ये या सिस्टीम दिसतील.
तोटे: मायलेजच्या बाबतीत, ऑल-व्हील ड्राइव्ह सिस्टमसह सुसज्ज वाहने तुम्हाला आनंदी ठेवू शकत नाहीत, कारण या वाहनांचे मायलेज अनेकदा खूप कमी असल्याचे आढळून येते. ही वाहने ऑफ-रोड राइडिंगसाठी विशेष नाहीत.
फोर व्हील ड्राइव्हचे फायदे आणि तोटे
फायदे: फोर व्हील ड्राइव्ह सिस्टीम मॅन्युअल कंट्रोलवर आधारित आहे, म्हणजे 4WD कधी बटण गुंतवायचे हे ड्रायव्हर ठरवतो. ऑफ-रोडिंग दरम्यान ही वाहने सर्वोत्तम मानली जातात. खराब रस्त्यांसाठी ही कार सर्वोत्तम आहे. 4WD वाहने खाचखळगे असलेल्या रस्त्यांवर कोणत्याही समस्येशिवाय धावतात, म्हणूनच बहुतेक SUV वाहनांमध्ये 4WD डीफॉल्ट म्हणून उपलब्ध असते.
तोटे: जेव्हा तुम्ही चारचाकी चालवता तेव्हा वाहनाचे मायलेज कमी होते. 4 व्हील ड्राइव्ह कार या ऑल व्हील ड्राइव्ह कारपेक्षा महाग असतात.
कोणते तुमच्यासाठी चांगले?
तुम्ही ऑल-व्हील ड्राइव्ह की फोर-व्हील ड्राइव्ह खरेदी करता हे पूर्णपणे तुमच्या दैनंदिन ड्रायव्हिंगच्या परिस्थितीवर अवलंबून असते. तुम्ही खरोखर ऑफ-रोडर असल्यास, 4WD वाहन हा एक चांगला पर्याय ठरु शकतो, तर इतर प्रत्येकासाठी, स्वयंचलित AWD प्रणाली पुरेशी आहे.