Dogs Chasing Bike In Night: आपल्या देशात बहुतेक लोकांकडे वैयक्तिक वाहन म्हणून दुचाकी आहेत. आपल्या बाईकच्या मागे कुत्रे (Dog) धावल्याचा अनुभव प्रत्येकालाच आलेला असेल. तुम्ही जर रात्री उशिरा दुचाकीने (Bike) प्रवास करत असाल तर तुमची बाईक पाहून कुत्रे भुंकण्यास सुरूवात करतात. कधी कधी हे कुत्रे इतके उग्र होतात की, ते बाईकच्या मागे चावायला धावतात. यामुळे अनेक वाहन चालक घाबरून खाली पडतात. पण, पुढे असे घडू नये किंवा कुत्रा तुमच्या दिशेने धावला तर त्याने तुम्हाला चावू नये, असे तुम्हाला वाटत असेल तर आज आम्ही तुम्हाला सोप्या ट्रिक्स सांगणार आहोत, ज्यामुळे यापासून तुम्हाला बचाव करता येईल.

बाईकच्या मागे कुत्रे का धावतात?

जेव्हा तुमच्या बाईकचा वेग जास्त असतो तेव्हाच असे घडते. बाईकचा वेग पाहून कुत्र्यांना बाईकपेक्षा वेगाने धावण्याची इच्छा जागृत होते. त्यामुळे वेगाने धावणाऱ्या बाईकमागे ते भुंकत धावत सुटतात. वास्तविक, जेव्हा एखादी बाईक भरधाव वेगाने कुत्र्यांच्या जवळून जाते, तेव्हा कुत्रे भडकतात आणि भुंकायला लागतात. म्हणून, जर तुम्हाला कुत्र्यांनी रात्रीच्या वेळी तुमच्या दुचाकीवर भुंकावे असे वाटत नसेल, तर त्यावेळी आपल्या बाईकचा वेग कमी करा.  हे तुमच्यासाठी फायद्याचे आहे. अन्यथा अपघात होऊ शकतो.

Two youths died after drowning in a tank in Bhalivali vasai news
भालिवली येथील कुंडात बुडून दोन तरुणांचा मृत्यू
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
pune officers without helmet no entry
पुणे: सावधान ! महापालिकेच्या इमारतीमध्ये हेल्मेट शिवाय प्रवेश कराल तर…!
Bike caught a fire alive man burnt in fire viral video on social media
VIDEO: एक चूक जीवावर बेतली! गाडीला आग लागताच लोक विझवायला गेले; पण पुढच्या क्षणी जे झालं ते पाहून उडेल थरकाप
Pune Blockade, Reckless driving, crime pune,
शहरबात : नाकाबंदीचे फलित
stray dogs dead
कांदिवलीमध्ये १४ भटक्या कुत्र्यांचे मृतदेह
speeding bike hit police, pune, bike hit police,
पुणे : नाकाबंदी करणाऱ्या पोलिसांना भरधाव दुचाकीची धडक, दुचाकीवरील सहप्रवासी तरुणीसह चौघे जखमी

(हे ही वाचा : खरंच कार आणि बाईकचे मायलेज वाढवणारे कोणतेही उपकरण आहे का? जाणून घ्या यामागील सत्य )

‘ही’ ट्रिक वापरा

बाईक चालवताना सर्वप्रथम तुमच्या गाडीचा वेग कमी करा. गाडीचा वेग कमी केल्याने कुत्रा तुमच्या गाडीच्या मागे धावणार नाही. जर दुचाकीचा वेग कमी करूनही कुत्रा भुंकत असेल आणि चावण्याचा प्रयत्न करत असेल, तर घाबरू नका आणि बाईकचा वेग वाढवू नका, कारण, अशावेळी अचानक वेग वाढवल्याने अपघात होऊ शकतो. अशावेळी बाईक थांबवून कुत्र्यांना थोडा घाबरवण्याचा प्रयत्न करा. यानंतर, हळूहळू दुचाकी पुढे सरकवा आणि तिथून निघून जा. असे केल्यास कुत्रा तुम्हाला चावणार नाही आणि तुम्ही सुरक्षितपणे तेथून निघून जाऊ शकता.