Bike Care Tips: मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून पावसाळ्याच्या दिवसात नियमित बाईकने प्रवास करणाऱ्या बाईकस्वारांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. बऱ्याचदा पावसाचे पाणी पेट्रोलच्या टाकीत जाते, त्यामुळे बाईकमध्ये अनेक प्रकारच्या समस्या उद्भवतात. पण, काही गोष्टींची योग्य काळजी घेतल्यास तुम्हाला अशा समस्या टाळता येतील.
पाण्यामुळे होईल इंजिन खराब
बाईकच्या पेट्रोल टाकीत पाणी गेल्यास अनेक समस्यांचा धोका वाढतो. यामुळे बाईकचे इंजिन खराब होण्याचा धोका असतो, शिवाय ते दुरुस्त करण्यासाठी बराच खर्चदेखील होऊ शकतो.
पाणी गेल्यास बाईक चालू करू नका
बाईकच्या पेट्रोलच्या टाकीत पाणी शिरल्यास तुम्ही लगेच बाईक चालू करण्याचा प्रयत्न करू नका, यामुळे बाईकच्या इंजिनपर्यंत पाणी जाण्याचा धोका वाढू शकतो.
टाकी पूर्ण रिकामी करा
पेट्रोलच्या टाकीत पाणी गेल्यास बाईक सुरू न करता ती पूर्ण रिकामी करा आणि काही काळ सुकवण्यासाठी ठेवा. त्यामुळे तुमच्या बाईकची पेट्रोल टाकी पूर्णपणे रिकामी आणि कोरडी होईल.
पाण्यापासून तेल वेगळे करा
आता बाटलीमध्ये पाणी आणि पेट्रोलचे मिश्रण काही वेळ ठेवल्यानंतर ते वेगळे होईल, ज्यामध्ये पाणी वरच्या बाजूला आणि पेट्रोल खालच्या भागावर स्थिर होईल. आता बाटलीतून काळजीपूर्वक पाणी बाहेर काढा, मग बाटलीत फक्त पेट्रोल उरेल.
हेही वाचा:कारच्या गंज प्रतिबंधात्मक संरक्षणासाठी काय कराल? फॉलो करा ‘या’ टिप्स
आता इंजिन तपासा
वरील सर्व गोष्टी तपासल्यानंतर शेवटी इंजिनदेखील तपासून घ्या, यामुळे इंजिनपर्यंत पाणी पोहोचले की नाही हे कळेल. इंजिनपर्यंत पाणी पोहोचल्यास बाईक लगेच सुरू करु नये. परंतु, जर इंजिनपर्यंत पाणी पोहोचल्यास सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन इंजिनपर्यंत पोहोचणारे पाणी काढून टाका.