Traffic Car Driving: अनेक जण दररोज ऑफिसला जाण्यासाठी किंवा एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी जाताना कारचा वापर करतात. शहरी भागातील रस्त्यांवर सकाळ-संध्याकाळ मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक असते. अनेकदा या ट्रॅफिकमध्ये एक-दोन तासही वाया जातात. तसेच बऱ्याचदा ट्रॅफिकमध्ये कशी गाडी चालवायची हेदेखील अनेकांच्या लक्षात येत नाही, त्यामुळे आज आम्ही तुम्हाला या बातमीच्या माध्यमातून ट्रॅफिकमध्ये गाडी चालवताना त्रास होत असल्यास काय काळजी घ्यावी हे सांगणार आहोत.

ट्रॅफिकमध्ये काय काळजी घ्याल?

एका लेनमध्येच गाडी चालवा

Vashi toll plaza toll exemption traffic congestion mumbai entryways
टोलमुक्तीनंतरही कोंडी कायम, वाशी टोलनाक्यावर दोन्ही प्रवेशमार्गांवर वाहतुकीचा ताण
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Car Cabin Bad Smell
तुमच्याही गाडीमध्येही सतत घाणेरडा दुर्गंध येतो? मग एका स्वस्तातल्या सोप्या उपायाने गाडी आतून होईल फ्रेश
Important tips to help prevent car theft
‘या’ छोट्या टिप्स फॉलो केल्यास चोर तुमची कार कधीही चोरणार नाही
Smart Driving Tips To driving in fog
Smart Driving Tips : हिवाळ्यात विंडशिल्डवरील धुके कसे काढाल? मग ही वाचा सोपी ट्रिक; प्रवास होईल सुरक्षित
pune Arguments among rickshaw pullers over passengers at Pune railway station
सुरक्षित रिक्षाप्रवासाची हमी कोण देणार ? त्रस्त प्रवाशांचा सवाल
Car Tyre Tips
‘या’ सोप्या टिप्स लक्षात घेतल्यास कार आणि बाईकचा टायर चालेल दीर्घकाळ
Second Hand Bike tips
सेकंड हॅण्ड बाईक खरेदी करण्यापूर्वी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्या

काही लोक ट्रॅफिकमध्ये गाडी चालवताना सतत लेन बदलतात. लेन बदलल्याने अपघाताचा धोका वाढतो. म्हणून जेव्हा तुम्ही तुमची गाडी ट्रॅफिकमध्ये चालवता, तेव्हा नेहमी गाडी एकाच लेनमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुम्हाला गाडी चालवताना कोणतीही अडचण येणार नाही आणि इतर गाड्यांचेही नुकसान होणार नाही.

शांत राहा

ऑफिसला किंवा घरी जाताना बराच वेळ गाडी ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर अनेकदा चालक आक्रमकपणे वागतो, त्यामुळे अपघात आणि वादाचा धोकाही वाढतो. अशा परिस्थितीत तुम्ही स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. यावेळी तुम्ही गाडीमध्ये बसून आवडीची गाणीही ऐका, चित्रपट पाहा किंवा पुस्तक वाचा.

३६० कॅमेरा वापरा

बऱ्याच नवीन कारमध्ये कंपन्यांकडून उत्तमोत्तम फीचर्स दिले जातात. यातील एक वैशिष्ट्य म्हणजे ३६० डिग्री कॅमेरा. या वैशिष्ट्यामुळे ट्रॅफिकमध्ये आपले वाहन चालविणे तुमच्यासाठी सोपे होईल. ट्रॅफिकमध्ये ३६० डिग्री कॅमेरा सुरू केल्यानंतर स्क्रीनवर संपूर्ण माहिती उपलब्ध मिळेल, ज्यामुळे शक्य असल्यास तुम्ही तुमची गाडी स्क्रॅच किंवा नुकसान न करता चालवू शकता.

गूगल मॅप वापरा

जर तुम्हाला ट्रॅफिक आणि गर्दीच्या रस्त्यावर गाडी चालवताना त्रास होत असेल तर प्रवास सुरू करण्यापूर्वीच तुम्ही गूगल मॅप वापरू शकता. तुम्हाला ज्या ठिकाणी जायचे आहे तेथे किती रहदारी आहे, याची माहिती नकाशाच्या माध्यमातून मिळते. असे केल्याने तुमची ट्रॅफिकमध्ये गाडी चालवण्याच्या त्रासापासून सुटका होईल.

हेही वाचा: चुकीच्या पद्धतीने स्कुटी चालवल्याने उद्भवतील अनेक समस्या; ‘या’ टिप्स करतील मदत

सुरक्षित अंतर ठेवा

गाडी ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर शांत राहून आजूबाजूच्या गाड्यांपासून सुरक्षित अंतर ठेवा, जेणेकरून ट्रॅफिक सुटल्यावर अपघात होणार नाही.

Story img Loader