Bike Tips: अनेकदा नवीन वाहनचालकांच्या मनात बाईक चालवण्याशिवाय विविध शंका असतात. त्यातीलच एक महत्त्वाची शंका म्हणजे बाईक थांबवताना आधी ब्रेक दाबायचा की क्लच? बऱ्याचदा वाहनचालक नवा असला किंवा जुना असला तरीही हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. मात्र, हे पूर्णपणे त्यावेळच्या परिस्थितीवर अवलंबून असते. जसे की बाईक थांबवताना तुम्ही कोणत्या पोझिशनमध्ये ब्रेक लावता, तुमचा वेग किती आहे आणि त्यावेळी बाईक कोणत्या गिअरमध्ये चालते. त्यामुळे अशा परिस्थितीत आधी ब्रेक दाबायचा की क्लच हे आज आम्ही तुम्हाला सांगू..
बाईक चालवणे अनेकांसाठी खूप सोपी गोष्ट आहे. कारण त्यात फक्त चार गोष्टी आहेत; ते म्हणजे क्लच, गियर, रेस आणि ब्रेक. बाईक चालवतानाच या चारही गोष्टींना समान महत्त्व आहे. काहीवेळा ते एकटे वापरले जातात आणि काहीवेळा इतर गोष्टींसह एकत्र वापरले जातात. म्हणजे क्लचबरोबर गियर आणि ब्रेकचा वापर केला जातो. मात्र, रेस देताना इतर कोणत्याही गोष्टींचा वापर केला जात नाही. तरीही बऱ्याच लोकांच्या मनात आधी ब्रेक लावायचा की क्लच दाबायचा की दोन्ही एकत्र दाबायचे? हा प्रश्न असतो.
पहिल्या परिस्थितीत
जर तुम्ही ट्रॅफिकमध्ये अडकला असाल किंवा तुमच्यासमोर एखादी व्यक्ती, प्राणी आला किंवा समोरचे वाहन थांबले तर अशा स्थितीत बाईक पूर्णपणे थांबवावी लागेल. अशा परिस्थितीत तुम्ही आधी क्लच आणि नंतर ब्रेक दाबणे गरजेचे आहे. त्यामुळे तुमची बाईक थांबेल, पण बंद होणार नाही. अशा स्थितीत अचानक ब्रेक लावल्यास बाईक थांबेल, पण बंदही होईल.
दुसऱ्या परिस्थितीत
जर तुमची बाईक खूप वेगात असेल आणि तुम्ही बाईकचा वेग कमी करण्यासाठी ब्रेक लावत असाल, तर अशा स्थितीत तुम्ही फक्त ब्रेक वापरू शकता. त्यानंतर तुम्ही क्लच लावून गियर खाली शिफ्ट करू शकता. बाईकचा वेग कमी करण्यासाठी हा एक चांगला सराव आहे.
तिसऱ्या परिस्थितीत
जर तुम्ही ताशी ५०-६० किलोमीटर वेगाने बाईक चालवत असाल आणि अचानक तुम्हाला बाईकचा वेग १०-१५ किलोमीटरने कमी करायचा असेल, तर अशा परिस्थितीत क्लच दाबण्याची गरज नाही. अशा परिस्थितीत हलका ब्रेक लावल्यानंतर, तुम्ही थ्रॉटलचा वापर करून बाईकला पुन्हा त्याच वेगाने आणू शकता.
हेही वाचा: Car Mileage Tips: कारचे मायलेज वाढविण्यासाठी ‘या’ महत्त्वाच्या टिप्स करतील मदत
चौथी परिस्थिती
एखाद्या आपत्कालीन परिस्थितीत जर तुम्ही ट्रॅफिकमध्ये, हायवेवर असाल किंवा कमी किंवा जास्त वेगाने बाईक चालवत असाल तर एखाद्या आपत्कालीन परिस्थितीत तुम्हाला अचानक बाईक थांबवावी लागली तर तुम्ही क्लच आणि ब्रेक दोन्ही एकत्र वापरू शकता. अशा परिस्थितीत कोणत्याही प्रकारच्या मायलेजचा विचार करू नये.