Electric Car vs petrol Car: भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे पेट्रोल-डिझेलवरील वाहनं वापरणं आता पूर्वीपेक्षा महाग झालं आहे. लोक आता पेट्रोल आणि डिझेलला पर्याय शोधत असून इलेक्ट्रिक कारकडे वळत आहेत. आता देशात इलेक्ट्रिक कारची क्रेझ झपाट्याने वाढत आहे. पण पेट्रोल-डिझेलसारखी इलेक्ट्रिक कार खरेदी करणे इतके सोपे नाही. नवीन इलेक्ट्रिक कार खरेदी करणं ही देखील खूप महागडी डील आहे.

सध्या भारतात इलेक्ट्रिक स्कूटर्सना मोठी मागणी आहे. इलेक्ट्रिक कारची देखील हळूहळू विक्री वाढत आहे. टाटा मोटर्सची टाटा नेक्सॉन ईव्ही, एमजी मोटर्सची झेडएस ईव्ही ही कारदेखील ग्राहकांची पसंती मिळवत आहे. परंतु अजूनही पेट्रोल आणि इलेक्ट्रिक कारमध्ये कोणती कार निवडायला हवी याबाबत ग्राहक संभ्रमावस्थेत आहेत. चला तर मग जाणून घेऊया पेट्रोल की इलेक्ट्रिक कोणते वाहन ठरेल तुमच्यासाठी फायदेशीर.

(आणखी वाचा : Tyre Tips: कार-बाईक चालवताय, रस्त्यावर सुसाट धावणार तुमची वाहने, ‘या’ टायर्सबद्दल माहितेय का? वाचा सविस्तर )

मायलेज आणि रेंज

इलेक्ट्रिक कार बॅटरी चार्ज केल्यानंतर चालते आणि ती एकदा चार्ज केली की ४०० किमी पर्यंतची रेंज देऊ शकते. तर पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या कारवरील खर्च हा किमान पाच ते सहा पट अधिक आहे.

कारचा मेंटनन्स

इलेक्ट्रिक कारची देखभाल करणे हे पेट्रोल इंजिनवाल्या कारच्या तुलनेत खूपच सोपे आणि कमी खर्चित असते. त्या तुलनेत इलेक्ट्रिक कारची सारखी सर्व्हिसिंग करावी लागत नाही. तसेच तिचा देखभाल खर्चदेखील कमी असतो.

(आणखी वाचा : E-cycles: रोजचा प्रवास करायचाय, e-cycle स्वारी ठरणार फायदेशीर, जाणून घ्या ‘या’ चार गोष्टींबाबत!)

कारचे आयुष्य
इलेक्ट्रिक कारची बॅटरी १० ते १२ वर्षे आरामात टिकेल असा दावा अनेक करण्यात आला आहे. परंतु बॅटरी खराब झाली तर मोठा फटका बसू शकतो कारण बॅटरीची किंमत खूप जास्त असते. परंतु ही बाब युजरवर अवलंबून आहे. तुम्ही कार चांगली मेन्टेन ठेवलीत, इको मोडवर चालवलीत तर बॅटरी खूप जास्त काळ टिकेल.

किमती

पेट्रोल-डिझेल कारच्या तुलनेत इलेक्ट्रिक कार या महाग आहेत.

Story img Loader