Which cricketer has Most expensive car in IPL: देशात सध्या आयपीएलचा उत्साह पाहायला मिळतो आहे. क्रिकेटप्रेमी त्यांच्या आवडत्या टीमला सपोर्ट करताना दिसत आहेत. तर एकीकडे प्रत्येक खेळाडूविषययी विविध चर्चा रंगताना दिसतेय. यातच आता क्रिकेटपटूंकडे असलेल्या महागड्या गाड्यांविषयी बोललं जात आहे. त्यांच्या उत्कृष्ट खेळासाठी ओळखले जाणारे क्रिकेटपटू, त्यांच्या कार कलेक्शनच्या बाबतीतही तशीच उत्कृष्ट निवड ठेवतात.
भारताचा कर्णधार रोहित शर्मापासून ते लीगमधील सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज विराट कोहलीपर्यंत, हे क्रिकेटपटू मैदानावर फक्त षटकार मारत नाहीत तर ते त्यांच्या सुपरकार्सनेदेखील सगळ्यांना प्रभावीत करतात. चला तर मग यानिमित्ताने जाणून घेऊया, आयपीएलमधील कोणत्या क्रिकेटरकडे आहे सर्वात महागाडी गाडी…
हार्दिक पांड्या: रोल्स-रॉइस फॅंटम (९.५ कोटी रुपये)
अष्टपैलू खेळाडू आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोल्स-रॉइस फॅंटमचा मालक आहे. ही लग्झरी कार ६.७५-लिटर V12 द्वारे समर्थित आहे जी ५६३ bhp, ९०० Nm टॉर्क आणि ८-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आउटपुट देते. कंपनीच्या मते, फॅंटम ५.४ सेकंदात ० ते १०० किमी प्रतितास वेग पकडते आणि तिचा टॉप स्पीड २५० किमी प्रतितास आहे. इंग्लंडमधील रोल्स-रॉइसच्या गुडवुड फॅसिलिटीमध्ये ही संपूर्ण कार अगदी सुरुवातीपासूनच अत्यंत काटेकोरपणे तयार केली आहे.
रवींद्र जडेजा: रोल्स-रॉइस रेथ (५.७५ कोटी रुपये)
रोल्स-रॉइसचे आणखी एक मालक दुसरे तिसरे कोणी नसून सर रवींद्र जडेजा आहेत. चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार स्टायलिश टू डोअर कूप रोल्स-रॉइस रेथचा मालक आहे. फोर सीटर असलेल्या या कारमध्ये ६.५-लिटर V12 पॉवरट्रेन आहे ज्यामध्ये दोन ट्रिम्स आहेत – एक ५९१ bhp आणि एक ६२४ bhp. यात दोन ड्राइव्हट्रेन पर्याय आहेत – ऑल-व्हील-ड्राइव्ह आणि रियर-व्हील-ड्राइव्ह.
केएल राहुल: अॅस्टन मार्टिन डीबी११ (४.२ कोटी रुपये)
फलंदाजीच्या बाबतीत केएल राहुल हा अगदी फर्स्टक्लास खेळाडू आहे आणि त्याच्या स्पोर्ट्स कारबद्दलही असेच म्हणता येईल. अॅस्टन मार्टिन डीबी११ ही दोन पॉवरट्रेनमध्ये उपलब्ध आहे – ४-लिटर ट्विन-टर्बो V8 आणि ५.२-लिटर ट्विन-टर्बो V12. ही ग्रँड टूरर रियर-व्हील-ड्राइव्ह आहे आणि तिची किंमत ३.३० कोटी रुपयांपासून सुरू होते (एक्स-शोरूम इंडिया). V12 ५०३ bhp आणि ६७५ Nm टॉर्क निर्माण करते आणि ८-स्पीड ZF टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेले आहे. ही कार ४ सेकंदात ० ते १०० किमी अंतर कापते आणि त्याचा कमाल वेग ताशी ३०१ किमी आहे.
रोहित शर्मा: लॅम्बोर्गिनी उरुस एस (४.१८ कोटी रुपये)
भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधाराला एसयूव्ही आवडतात आणि त्याच्याकडे लॅम्बोर्गिनी उरुस आहे जी ३९९९ सीसी व्ही८ बाय-टर्बो इंजिनला चालना देते. ही एक फोर-व्हील-ड्राइव्ह एसयूव्ही आहे जी ६५७.१० बीएचपी आणि ८५० एनएम व्ही८ बाय-टर्बो इंजिन तयार करते आणि ८-स्पीड ऑटोमॅटिकशी जोडलेली आहे. उरुस ३.५ सेकंदात ०-१०० किमी प्रतितास वेग पकडते आणि तिचा कमाल वेग ३०५ किमी प्रतितास आहे.
विराट कोहली: बेंटले कॉन्टिनेंटल जीटी (४ कोटी रुपये)
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा माजी कर्णधार विराट कोहली हा सगळ्यात लोकप्रिय खेळाडू आहे. कॉन्टिनेंटल जीटी ही रिगल असली तरी बोल्ड आहे आणि ६-लिटर W12 पेट्रोल इंजिनसह ती खूपच प्रभावी आहे जी ६२६ बीएचपी देते आणि तिचा टॉप स्पीड ३३५ किमी प्रतितास आहे.