Car Care Tips: सध्या भारतातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. या दिवसांत अनेक जण डोंगरावर फिरायला जातात. मात्र, यादरम्यान गाडीचे ब्रेक फेल होण्याची समस्या बऱ्याचदा निर्माण होते. अशा स्थितीत ही अचानक उद्भवलेली समस्या कशी हाताळायची? तुम्हीही पावसाच्या दिवसांत कारने डोंगराळ भागात जाण्याचा विचार करीत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

प्रवासादरम्यान कारचे ब्रेक फेल का होतात?

जेव्हा कारच्या ब्रेक शूजवर खूप दबाव असतो तेव्हा ब्रेक ड्रम आणि ब्रेक डिस्क खूप गरम होतात. त्यामुळेच कारचे ब्रेक व्यवस्थित काम करीत नाहीत. तसेच ब्रेकची पकडदेखील खूप कमकुवत होते. अशा परिस्थितीत तुम्हाला काही गोष्टींची विशेष काळजी घ्यायला हवी.

vehicle got stuck on the railway track due to gravel stone at mothagaon village in dombivli
डोंबिवली मोठागाव रेल्वे फाटकात खडी टाकल्याने वाहने घसरण्याचे प्रमाण वाढले, दुचाकी स्वारांची सर्वाधिक अडचण
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
Heart touching video of police who help poor man on road video goes viral
“शेवटी हिशोब कर्माचा होतो” पोलिसानं गरीब रिक्षा चालकाबरोबर काय केलं पाहा; VIDEO बघून डोळ्यांत येईल पाणी
Funny slogan written behind indian trucks Photo goes viral on social media
PHOTO: म्हणून ट्रक चालकांचा नाद करु नये; ट्रकच्या मागे लिहला खतरनाक मेसेज, वाचून सगळेच लांब जाऊ लागले
Shocking video of three Boys seriously injured in motorcycle stunt crash video
“जेव्हा कर्माचे फळ लगेच मिळते” भर रस्त्यात तरुणांबरोबर काय घडलं पाहा; VIDEO पाहून सांगा तुम्हाला काय वाटतं?
help prevent car theft
कार चोरी होण्यापासून वाचवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स करतील मदत
Pune driving opposite direction, driving in the opposite direction,
पुणे : विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्या बेशिस्तांवर कडक कारवाई
terrible accident occurred today on Samriddhi Highway in Karanja Washim district
‘समृद्धी’वरील अपघाताचे सत्र थांबता थांबेना; कारची ट्रकला धडक, चालक ठार

कारचालकाचे दुर्लक्ष

ब्रेक फेल होण्याचे मुख्य कारण म्हणजे कारचालकाचे दुर्लक्ष हेदेखील यामागील मुख्य कारण आहे. गाडीच्या ब्रेकचे आयुष्य मर्यादित असते. त्यानंतर ते बदलणे आवश्यक असते. अपघाताची शक्यता कमी करण्यासाठी तुम्ही तुमची गाडी नियमितपणे मेकॅनिककडून तपासून घेतली पाहिजे.

चिखलातून गाडी चालवल्यास

चिखलातून किंवा पाण्यातून गाडी चालवताना अतिरिक्त खबरदारी घेतली पाहिजे. तुमची गाडी चालवताना वेग कमी करा आणि ब्रेक फेल होऊ नयेत म्हणून हळूवारपणे ब्रेक दाबा.

डोंगराळ प्रवासात ब्रेक का फेल होतात?

अनेकदा डोंगराळ भागातील प्रवासात कारचालक खूप जास्त वेळा ब्रेक वापरतात आणि त्यामुळे ब्रेक शू खूप गरम होतात. डोंगरावर गाडी चालवताना कारचालकाने ब्रेकवर जास्त दाब दिला तरी ब्रेक लवकर खराब होऊ शकतात. कधी कधी ओव्हरलोडिंग हेदेखील ब्रेक खराब होण्यामागचे एक प्रमुख कारण असू शकते. तसेच अनेक वाहनचालक चुकीच्या गिअरने गाडी चालवतात आणि त्यामुळे ब्रेक त्यांच्या पूर्ण क्षमतेने काम करीत नाहीत. अशा परिस्थितीत ब्रेक फेल होण्याची शक्यता वाढते.

हेही वाचा: प्रवासादरम्यान गाडी चालवताना अचानक वादळ आल्यास काय कराल? ‘या’ गोष्टींची घ्या विशेष काळजी

कारच्या ब्रेकची काळजी कशी घ्यावी?

जर तुम्ही कारने डोंगराळ भागात प्रवास करीत असाल, तर ब्रेक नीट सांभाळा; जेणेकरून त्यांचे नुकसान होणार नाही. तसेच घराबाहेर पडण्यापूर्वी गाडीचे ब्रेक आवर्जून तपासा.

टेकड्यांवर कारचे ब्रेक योग्य प्रकारे काम करण्यासाठी, डोंगराळ प्रवासादरम्यान इंजिन ब्रेकिंगचा अधिक वापर करणे महत्त्वाचे आहे.

कारची नियमित तपासणी आणि ब्रेक चांगल्या स्थितीत ठेवणे यांद्वारे तुम्ही तुमच्या गाडीचे ब्रेक निकामी होण्यापासून टाळू शकता. त्यासाठी तुमच्या स्थानिक मेकॅनिकशी बोला आणि तुमच्या गाडीचे ब्रेक अधिक काळ टिकविण्यासाठी त्यांचा सल्ला घ्या. कारचा गैरवापर करू नका.

तुमचा ब्रेक निकामी झाल्यास ब्रेक पेडल अनेक वेळा जोरात पंप करा किंवा तुम्ही तुमची कार कमी गियरमध्ये ठेवू शकता किंवा तुमच्या कारवर नियंत्रण मिळविण्यासाठी पार्किंग ब्रेक वापरू शकता.