Why do people prefer white colour when buying a car?: तुमची आवडती कार कुठली? असं विचारल्या पेक्षा ‘कोणत्या रंगाची’ हे अधिक महत्वाचं झालंय. बाजारपेठेत लाल, काळी, निळी, पिवळी, नारंगी, सोनेरी अश्या अनेक रंगांच्या आकर्षक कार उपलब्ध असूनही ग्राहक ‘पांढरी’च कार का मागतात ? भारतात याच कारला अधिक पसंती का देतात? हाच कुतूहलाचा प्रश्न पडतोय. या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी संशोधकांनी यावर संशोधन करून एक अहवाल सादर केलाय. या संशोधनातून ‘हे’ वैद्यानिक उत्तर पुढं आलंय की, ते वाचून तुम्हीही म्हणाल ‘अरे व्वा…!’ चला तर वाचा मग सविस्तर.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतात पांढऱ्या रंगाचीच जास्त विक्री

जे.डी. पाँवरच्या सर्वेक्षणात असे आढळून आले की, भारतात विकल्या जाणाऱ्या प्रत्येत २ कारमागे एका कारचा रंग पांढरा आहे. भारतीय लोक भडक रंगाऐवजी फिक्या रंगाला पसंती देत असल्याचे या सर्व्हेत म्हटले आहे. देशातील एक चतृतांश विक्री झालेल्या कार या सिल्वर किंवा ग्रे रंगाच्या होत्या. तर उत्तर भारतातील लोक दक्षिण भारतापेक्षा जास्त पांढऱ्या रंगाला पसंती देत आहेत. दक्षिण भारतातील लोक ३४% पांढऱ्या कार वापरतात तर उत्तर भारतातील लोक ६६% लोक पांढऱ्या कार वापरतात. २०१३ च्या कारच्या विक्रीमध्ये ११% रंगाच्या कारची विक्री झाली आहे तर ४% काळ्या रंगाच्या कारची विक्री झाली आहे. मध्यंतरी तरूणाईमध्ये अशा भडक रंगाच्या कारची जास्त क्रेझ दिसून येत होती पण आता फिक्या रंगाला भारतीय लोकांची जास्त पसंती मिळाली आहे.

(हे ही वाचा: रात्रीच्या वेळी बाईकच्या मागे कुत्रे धावल्यानंतर नेमकं काय करावं? फक्त ‘ही’ ट्रिक वापरा, भुंकणारही नाही)

ऑटोमोटिव्ह OEM कोटिंगसाठी BASF च्या कलर रिपोर्ट नुसार

पांढऱ्या रंगाची कार विकण्याची अनेक कारणे आहेत. भारत एक असे शहर आहे जिथे उन्हाळा जवळजवळ 9 महिने टिकतो, त्यामुळे साहजिकच उन्हाळ्यात जेव्हा कार दिवसभर उन्हात उभी असते तेव्हा त्यामुळे गाडी गरम होते पण इतर पांढऱ्या कारच्या तुलनेत ते जास्त गरम होत नाही. कारण सुर्याची किरणे रिफ्लेक्ट होतात. म्हणूनच इतर गाड्यांच्या तुलनेत पांढऱ्या कारवर उष्णतेचा फार परिणाम होत नाही. त्यामुळे पांढऱ्या रंगाच्या गाड्यांची मागणी कायम आहे.

‘या’ कारणामुळे सुध्दा ग्राहकांना पांढरी कार आवडते

पांढऱ्या रंगाच्या मोटारींची जास्त विक्री होण्यामागे अनेक कारणे आहेत, त्यातील एक कारण म्हणजे, रात्रीच्या प्रवासात पांढऱ्या रंगाची कार सुरक्षित मानल्या जाते. कारण रात्रीच्या वेळीही पांढऱ्या रंगाच्या गाड्या स्पष्टपणे दिसतात. त्याचबरोबर त्यांना जास्त देखभालीची आवश्यकता नसते. त्यावर घाण आणि धूळ सहज दिसून येते, जी साफ करण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागत नाही. दुसरीकडे, पांढऱ्या रंगाच्या कारवर स्क्रॅच असल्यास ते सहज दिसून येते. ते त्वरित दुरुस्त करण्यासाठी तुम्ही ते गॅरेजमध्ये घेऊन जाऊ शकता. अगदी साधी आणि सोपी देखभाल असल्याने ग्राहकही म्हणतो पांढरी कार… अरे व्वा…!

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why do people prefer white colour when buying a car find out what is the reason pdb
Show comments