Three Wheels In Autorickshaw: एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याासाठी ऑटोरिक्षाचा वापर केला जातो. मुंबईसारख्या महानगरांमध्ये असंख्य ऑटोरिक्षा पाहायला मिळतात. ज्यांच्याकडे खासगी वाहन नसते. असे लोक बस, रिक्षा अशा पर्यायांची मदत घेत असतात. बस, ट्रेन या सार्वजनिक वाहनांमध्ये काही वेळेस खूप गर्दी असते. अशा वेळी ऑटोरिक्षाने प्रवास करणे फार सोईस्कर असते. पण ऑटोरिक्षामध्ये बसल्यावर ‘रिक्षाला ३ चाकं का असतात?’ असा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल. इतर वाहनांप्रमाणे ३ चाकी ऑटोरिक्षामध्ये दोन किंवा चार चाकं का नसतात हे जाणून घ्या.
खर्च
रिक्षाचे इंजिन व अन्य तांत्रिक गोष्टींसाठी जास्त पैसे खर्च होत नाहीत. त्यामुळे तीन चाकं असणाऱ्या ऑटोरिक्षासाठी इतर चारचाकी वाहनांच्या तुलनेमध्ये कमी खर्च लागतो.
आकार
लहान चाकं असल्याने रिक्षा कुठेही शिरु शकते. छोट्या ठिकाणी ती पार्क करता येते. शिवाय गर्दीमध्ये रिक्षा चालवताना फारसा त्रास होत नाही. याउलट चारचाकी गाड्यांची रचना अशी असते, ज्यामुळे कमी जागेमध्ये कार चालवणे कठीण होते.
इंधनाची कार्यक्षमता
तीन चाकी ऑटोरिक्षामध्ये कमी प्रमाणात इंधन लागते. (चारचाकी वाहनांच्या तुलनेमध्ये) या विशिष्ट रचनेमुळे रस्त्यावरुन फिरताना फारसा त्रास होत नाही.
स्थिरता
चारचाकी कार्सपेक्षा सर्वसामान्य ऑटोरिक्षा या जास्त स्थिर असतात. ओलसर किंवा खडकाळ रस्त्यांवरुन रिक्षा चालवणे सोपे असते. शिवाय ऑटोरिक्षामध्ये कमी पेलोड क्षमता असते.
या गोष्टींमध्ये तीन चाकांची ऑटोरिक्षा चारचाकी वाहनांपेक्षा वरचढ ठरते. ऑटोरिक्षाला ३ चाकं का असतात हे जाणून घेण्यासाठी त्याच्या डिझाइनबद्दल समजून घेणे आवश्यक असते. फार पूर्वी सामान एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहचवण्यासाठी म्हणून ऑटोरिक्षाची निर्मिती करण्यात आली होती. गर्दीच्या ठिकाणी हे वाहन अवजड सामानासह व्यवस्थितपणे चालवता यावी या उद्देशाने ऑटोरिक्षाचे डिझाइन तयार केले गेले होते. यामुळे ऑटोरिक्षाला ३ चाकं असतात असे म्हटले जाते. पण या वाहनाच्या रचनेमध्ये काही त्रुटी पाहायला मिळतात.