टू-व्हीलर विमा खरेदी केल्यानंतर, बहुतेक पॉलिसीधारकांना वाटते की त्यांच्या सर्व समस्या दूर होतील. तथापि, विमा क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, विमा पॉलिसी घेणे हे केवळ अर्धे काम आहे आणि पॉलिसीधारकाने हे समजून घेतले पाहिजे की दुसरे काम म्हणजे विमा दाव्याचा योग्य प्रकारे वापर करणे. प्रोबस इन्शुरन्सचे संचालक राकेश गोयल यांच्या म्हणण्यानुसार, टू-व्हीलर इन्शुरन्स क्लेम करताना पॉलिसीचे दस्तऐवज नीट तपासले पाहिजेत. तसेच विमा पॉलिसी काय कव्हर करते. हे देखील समजून घेणे महत्वाचे आहे. टू-व्हीलर इन्शुरन्स क्लेमचे दावे मोठ्या संख्येने का रद्द होतात याची कारणे जाणून घेऊ या.
नियम तोडणे
अनेक वेळा असे दिसून येते की लोक ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय गाडी चालवतात. अशा परिस्थितीत, अपघात झाल्यास, विमा इन्शुरन्स क्लेम नाकारते. याशिवाय अनेक जण दारू पिऊन गाडी चालवतात. त्यामुळे विमा कंपनी अपघात झाल्यास केलेला दावा नाकारते. अशा परिस्थितीत, जेव्हाही तुम्ही बाईक चालवता तेव्हा वैध कागदपत्र घेऊनच चालवा.
पॉलिसीचा प्रीमियम भरण्यास विलंब
टू-व्हीलर इन्शुरन्स क्लेम नाकारण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे पॉलिसीचा प्रीमियम वेळेवर न भरणे. काहीवेळा वाहन मालक त्यांच्या दुचाकी विमा पॉलिसीचे वेळेवर नूतनीकरण करत नाहीत, ज्यामुळे विमा कंपनी दावा नाकारते. याशिवाय, इन्शुरन्स क्लेम करताना तुम्ही योग्य माहिती लपवली तरी तुमचा दावा नाकारला जाऊ शकतो.
टू-व्हीलरला मॉडिफाई करणे
तरुण स्पोर्ट्स बाइक्समध्ये बदल करतात. ज्यासाठी आरटीओची परवानगी आवश्यक आहे. परंतु अनेक क्लेम मध्ये असे दिसून आले आहे की बाइक किंवा स्कूटरमध्ये बदल केले जातात परंतु त्यासाठी आवश्यक कागदपत्रे पूर्ण केली जात नाहीत. यामुळे देखील विमा कंपनी इन्शुरन्स क्लेम नाकारू शकते.
ओनरशिप ट्रांसफर न करणे
बाईक मालक काही वेळा मालकी हस्तांतरित न करता त्यांची वाहने विकतात. या परिस्थितीत, अपघात किंवा दावा केल्यास, विमा कंपनी तो नाकारते. म्हणून, जेव्हाही तुम्ही जुने वाहन विकत घेता किंवा विकता तेव्हा तुम्ही त्याची मालकी हस्तांतरित केली पाहिजे. कारण वाहनाच्या मालकीच्या हस्तांतरणाबरोबरच विमाही नवीन मालकाच्या नावावर हस्तांतरित होतो.