Why is ‘Horn Ok Please’ Written Behind the Trucks: रस्त्यांवरुन धावणारे आपण ट्रक पाहतो. मात्र, त्याच्या मागे नेहमीच एखादी शायरी किंवा स्लोगन लिहिलेले असते हे नक्की. देशात ट्रकच्या मागे शायरी लिहिण्याची एक परंपरा आहे. त्याही पुढे जात काही लोक  ‘बुरी नजरवाले तेरा मुंह काला’ सारखी स्लोगन लिहितात. बाकी, ट्रकच्या मागे यातलं काहीही लिहिलेलं नसलं तरी ‘Horn Ok Please’ हे वाक्य नक्कीच असतं. या हॉर्न-ओके-प्लीजचा अर्थ काय हे त्या ट्रक चालकाला देखील माहित नसतं, पण वाक्य लिहिलेलं असलंच पाहिजे. ही ओळ इतकी प्रसिद्ध आहे की, काही वर्षांपूर्वी त्यावर बॉलीवूडचा चित्रपटही तयार झाला होता. ही ओळ विशेषतः माल वाहतूक करणाऱ्या ट्रकवर लिहिली जाते. पण तुम्हाला या ओळीचा अर्थ काय आहे माहितेय का? चला तर मग आज आपण ‘Horn Ok Please’ लिहिले का जात असेल, जाणून घेऊयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘Horn Ok Please’ चा अर्थ काय?

‘हॉर्न ओके प्लीज’ चा अर्थ वाहन ओव्हरटेक करण्यापूर्वी हॉर्न देऊन माहिती देणे. म्हणजेच ट्रकचालक मागे धावणाऱ्या वाहनांना ओव्हरटेक करण्यासाठी हॉर्न वाजवण्यास सांगतात. जुन्या काळी अनेक ट्रकमध्ये साइड मिरर उपलब्ध नव्हते, त्यामुळे चालकांना मागून येणाऱ्या वाहनांच्या माहितीसाठी ते लिहावे लागत होते, जेणेकरून ते मागून येणाऱ्या वाहनाला साइड देऊ शकत होते.

(हे ही वाचा: तुमच्या कारमध्ये असणाऱ्या ‘WD-40’ नावाच्या बाटलीचा अर्थ माहीत आहे का? जाणून आश्चर्यचकित व्हाल!)

Ok‘ लिहिण्यामागचे कारण काय?

या ओळीच्या मध्यभागी ‘Ok’ असे लिहिण्याची अनेक कारणे आहेत, त्यातील एक कारण म्हणजे दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी जेव्हा डिझेलची कमतरता भासली होती त्यानंतर ट्रकच्या डिझेलमध्ये केरोसिन मिक्स करुन चालवले जात होते. तर केरोसिन हे ज्वलनशील असल्याने त्यामुळे लगेच आग पेटते. केरोसिन असलेले ट्रकचा अपघात झाल्यास लगेच पेट घ्यायचे. याच कारणामुळे इशारा देण्यासाठी ट्रकवर ‘On Kerosene’ असे लिहिले होते. हेच आता OK मध्ये बदलले गेले आहे. त्यामुळेच आज ही जवळजवळ सर्वच ट्रकवर हे लिहिले जाते.

‘हे’ देखील आहे कारण

जुन्या काळी बहुतांश रस्ते अरुंद असायचे त्यामुळे ओव्हरटेकिंगच्या वेळी अपघाताचा धोका जास्त असायचा. मागे असलेल्या वाहनांद्वारे मोठे ट्रक दाखवले जात नाहीत, त्यामुळे ओके या शब्दाच्या वर एक बल्ब होता, जो ट्रक चालकाने वाहनाला पाठीमागून जाण्यासाठी सिग्नल देण्यासाठी लावला. त्यामुळे मागून धावणाऱ्या वाहनांना ओव्हरटेक करताना सोय झाली.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why is horn ok please painted on the back of almost every truck in india know in detail pdb