Why is Wearing a Seat Belt Important: देशात रस्ते अपघातात दरवर्षी हजारो लोक मृत्युमुखी पडतात. रस्ते अपघातात नाहक जाणारे हे बळी रोखण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने वेळोवेळी अनेक नियम तयार केले आहेत. तसेच कायदे आणखी कठोर केले आहेत. त्याचबरोबर गाड्यांमध्ये सीट बेल्ट घालणे अनिवार्य केले आहे. सीट बेल्ट म्हणजे भीषण अपघातात जीवन आणि मृत्यू यांच्यातील सीमारेखा आहे. या बेल्टमुळे आतापर्यंत लाखो लोकांचे जीव वाचल्याचे स्पष्ट झाले आहे. असे असतानाही सीट बेल्टकडे दुर्लक्ष केले जाते. परिणामी अपघातात मृत्यू होतो.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कारने प्रवास करताना आपल्याला दुखापत होऊ नये यासाठी वाहनांमध्ये सीट बेल्ट दिला जातो. हा सीट बेल्ट लावणं बंधनकारक आहे. बहुतांश कारचे चालक आणि चालकाशेजारी बसणारे प्रवासी सीट बेल्ट लावतात. परंतु कारच्या मागच्या सीटवर बसूनही सीट बेल्ट लावणारे प्रवासी क्वचितच पाहायला मिळतात. त्यामुळे आता देशातल्या अनेक शहरांमध्ये कारच्या मागच्या सीटवर बसून प्रवास करणाऱ्यांना देखील सीटबेल्ट अनिवार्य करण्यात आला आहे. 

वाहतूक पोलिस देशभरात मार्गदर्शक तत्त्वे जारी करतात आणि लोकांना सतत वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन करतात. नियम न पाळल्यास दंडाचीही तरतूद आहे. मात्र त्यानंतरही नियमांचे पालन न केल्याची प्रकरणे सातत्याने समोर येत आहेत. वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे अधिक अपघात होतात. असाच एक व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर समोर आला आहे ज्यामध्ये सीट बेल्ट न लावल्यामुळे एक महिला प्रवासी गंभीर जखमी झाली आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये असेही दिसून आले आहे की, सीट बेल्ट बांधलेल्या प्रवाशाला किरकोळ दुखापत झाली आहे.

सीट बेल्ट घालणे महत्वाचे का आहे?

व्हायरल झालेल्या व्हिडिओतील कारमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत. आतील प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात कैद होत आहे. यामध्ये दिसते की, कारच्या मागील सीटवर दोन प्रवासी आहेत. यापैकी एका मुलीने सीट बेल्ट घातला आहे तर दुसरी सीट बेल्ट न लावता आरामात बसलेली आहे. फ्रेममध्ये सर्व काही सामान्य दिसते परंतु थोड्याच वेळात कारला अपघात होतो. अपघात एवढा भीषण होता की, सीट बेल्ट न लावलेल्या मुलीच्या डोक्याला समोरच्या सीटवर जबर धक्का बसला. फ्रेममध्ये हे स्पष्टपणे पाहिले जाऊ शकते की, मुलीला इतकी दुखापत झाली होती की ती किंचाळली देखील. तर सीट बेल्ट बांधून बसलेल्या दुसऱ्या मुलीला फक्त किरकोळ दुखापत होते.

येथे पाहा व्हिडीओ

फ्रेममधला हा सीन वाहतुकीच्या नियमांचा चांगलाच धडा शिकवतो. नियमांचे पालन न केल्यास अपघातात गंभीर दुखापत होऊ शकते, हे या व्हिडिओतून आपल्याला शिकायला मिळते. कार अपघाताचा हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाल्याची माहिती आहे. यावर नेटिझन्सही जोरदार कमेंट करत आहेत. हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर gk_questions_ncert या हँडलसह शेअर करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why is it important to wear a seat belt this video viral on social media pdb