Car Driving Tips: आजच्या काळात बहुतांश लोकांकडे कार आहेत. तुमच्याकडे कोणतीही कार असो, तुम्ही कितीही महागडी कार खरेदी केलेली असेल पण ती वापरत असताना एका चुकीमुळे तुम्हाला मोठा नुकसानही होऊ शकतो. गेल्या काही काळात अपघातांचं प्रमाण वाढलं आहे. यामागे खराब रस्ते आणि वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या चालकांची मोठी चूक आहे. त्याचप्रमाणे गाडी चालवताना चालकाचा बेजबाबदारपणा, निष्काळजीपणाही याला कारणीभूत ठरतो. खरं तर, ड्रायव्हिंगचा मजबूत अनुभव असलेल्या लोकांकडूनही काही चुका होतात. त्यामुळे गाडी चालवताना खूप सतर्क रहावं लागतं. कार चालवायला शिकताना ड्रायव्हिंगची ‘एबीसी’ महत्त्वाची असते असं सांगितलं जातं. एक्सीलेटर, ब्रेक आणि क्लच ही ती ‘एबीसी’ होय. आपल्या गाडीमध्ये या तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात.

पहिला एक्सीलेटर, जो वाहनाचा वेग वाढवतो. दुसरा ब्रेक आहे, जो वाहन त्वरीत थांबवण्यासाठी वापरला जातो आणि तिसरा क्लच आहे, जो एक्सीलेटर आणि ब्रेक यांच्यातील दुवा म्हणून काम करतो. याशिवाय, कोणत्याही गीअरसह वाहनात एक्सीलेटर आणि ब्रेक अनावश्यक होतात. जर तुमची कार वेगात असेल तर तुम्ही कधीही क्लच दाबून ब्रेक लावू नका, हे तुम्ही ऐकले असेलच, पण हे असं का म्हटलं जातं, याविषयी आज आपण जाणून घेऊया…

Nagpur Results Nitin Gadkari Major Win Can Change Prime Minister Power Game
नितीन गडकरींचा विजय पालटणार सत्तेचा खेळ? ज्योतिषतज्ज्ञ म्हणतायत, “२०२४ पर्यंत काळजी, तर २०२६ ला मोठा..”
Bees attacked on women who had gone for vatpaurnima in Nive village of Poladpur taluka
रायगडात वटपूजन करताना अघटित घडले… जाणून घ्या काय आहे प्रकार…
nilesh lanke sharad pawar
“निलेश लंकेंना संसदेत पाहून लोक विचारतील, हा कोण…”, शरद पवारांचं वक्तव्य; म्हणाले, “ते मराठीत काय बोलतील…”
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Police found dead body of a man in lake but shocked as he suddenly start speaking shocking video
VIDEO: हे कसं झालं? ८ तास तलावात पडलेला ‘मृतदेह’; पोलिसांनी बाहेर खेचताच अचानक उठून बोलू लागला
Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”
Car Sales Drop in May 2024
देशातील बाजारात ‘या’ २ कारकडे ग्राहकांनी फिरवली पाठ; ३० दिवसात फक्त ४ लोकांनी केली खरेदी
Man wrote message for his wife in back of the car
नवऱ्यानं बायकोसाठी कारच्या मागे लिहला खास मेसेज; रस्त्यावर सर्व बघतच राहिले, VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक

(हे ही वाचा : ६९ हजार रुपये किंमत, एका चार्जवर धावेल ११० किलोमीटर; ‘या’ आहेत देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर, पाहा यादी)

तुमच्या गाडीमध्ये क्लचचे मुख्य कार्य कोणते?

वाहनचालकांनो, कारच्या क्लचचा वापर अतिशय सुयोग्यपणे केला जाणे गरजेचे आहे. तो न करणे म्हणजेच त्या क्लचचे आयुष्य कमी करणे व वेग नियंत्रणातील प्रभाव हळू हळू कमकुवत करण्यासारखे आहे. क्लचचे मुख्य कार्य म्हणजे तुमच्या कारचे गीअर शिफ्टिंग सुलभपणे केले जाणे. त्यासाठी तुम्ही क्लचचा वापर कसा करता ते महत्त्वाचे आहे. कारचे गीअर बदलण्याचं काम सहज करण्यासाठी क्लचचा उपयोग होतो. मात्र क्लचचा वापर करण्यात सफाईदारपणा नसेल तर तुमच्या गाडीची क्लच प्लेट लवकर खराब होऊ शकते. म्हणूनच गाडी चालवताना क्लचचा अनावश्यक वापर टाळावा. क्लचचा अधिक वापर केल्याने जास्त इंधन लागते. जिथे क्लचची गरज नाही तिथे अजिबात वापरू नका. नवीन ड्रायव्हर्स अनेकदा क्लचवर अधिक जोर देतात. यामुळे तुमची क्लच प्लेट देखील खराब होऊ शकते. यासाठी योग्य गीअर्स वापरा आणि गरज असेल तेव्हाच क्लच वापरा.

क्लचचा वापर गीअर गुंतण्यासाठी किंवा विलग करण्यासाठी केला जातो. कार, ​​बाईक किंवा कोणत्याही वाहनात क्लचची भूमिका खूप महत्त्वाची असते. जर वाहनाचा क्लच नीट चालला नाही तर तुम्हाला गाडी चालवता येणार नाही. वाहनातील क्लचचे काम इंजिनमधून येणारी वीज खंडित करणे आहे. जर क्लच नीट काम करत नसेल तर इंजिनमधून येणारी पॉवर कट करणे कठीण होऊन गाडी सुरू करणे किंवा चालणारी गाडी थांबवणे कठीण होते.

अनेकदा लोक गीअर बदलल्यानंतर क्लच सोडण्याची घाई करतात. त्यामुळे क्लच प्लेट लवकर घासल्या जातात आणि खराब होतात. याशिवाय काही जण कार चालवताना एका झटक्यात क्लच सोडतात. त्यामुळे क्लच प्लेट लवकर खराब होतात. अजिबात घाई न करता, सावकाशीने क्लच सोडला तर क्लच प्लेट दीर्घकाळ चांगल्या राहतील.

(हे ही वाचा : होंडा, बजाज फक्त पाहतच राहिल्या! ७४ हजाराच्या ‘या’ बाईकला खरेदी करण्यासाठी ग्राहकांच्या रांगा, ३० दिवसात ३ लाखांहून अधिक विक्री )

गाडीचे ब्रेक लावताना क्लच दाबल्यास काय होणार?

वाहन चालवताना अनेक लोक क्लच दाबून ब्रेक लावतात. उच्च वेगाने आणि उतारावरून उतरताना असे करणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. तुम्ही दुचाकीवरून असाल किंवा चारचाकी, पण अचानक तुम्ही क्लच दाबल्यास तुमच्या गाडीचा वेग अचानक ६०-७० पर्यंत जाऊ शकतो आणि ते हळूहळू वाढत जाईल. यासोबतच वाहनही नियंत्रणाबाहेर जाऊ शकते. कारण क्लच दाबल्याने गाडीची चाके गीअर्सच्या मजबूत पकडीतून पूर्णपणे सुटतात, त्यामुळे उतारावर असे केल्याने गाडीचा वेग वाढेल. तसेच या स्थितीत वाहनाचे ब्रेकही निकामी होऊ शकतात. हे तुमच्यासाठी फार धोकादायक ठरु शकते. वेगावर नियंत्रण हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. आपण किती वेगाने गाडी चालवू शकतो याचा एक साधारण अंदाज आपल्याला असतो. तिथे अजिबात हिरोगिरी करू नका.