Why Your Car Steering Shaking : कार कंपनी हल्ली अनेक अपडेटेड टेक्नोलॉजी वापरून कार बनवतात पण रस्ते खराब असल्याने किंवा कारची योग्य काळजी न घेतल्याने अनेकदा गाडीच्या अनेक समस्या निर्माण होतात. यातलीच एक समस्या म्हणजे कार चालवताना स्टेअरींगमध्ये वायब्रेशन जाणवणे. स्टेअरींगमध्ये वायब्रेशन जाणवणे कार चालवताना सुरक्षित नाही. पण तुम्हाला माहितीये का स्टेअरींगमध्ये वायब्रेशन का जाणवते? त्यामागे काही ठराविक कारणे आहेत. आज आपण त्यामागील प्रमुख चार कारणे जाणून घेणार आहोत.
चाकांचे अलाइनमेंट आउट होणे (Wheel alignment issues)
जर चाकांचा अलाइनमेंट आउट झाले असेल तर कार चालवताना स्टेअरिंगमध्ये वायब्रेशन जाणवते. यामुळे कार एकाच दिशेने चालते. तसेच वायब्रेशन जाणवते. यासाठी नियमित वेळोवेळी कार अलाइनमेंट चेक करणे महत्त्वाचे आहे.
सस्पेंशन खराब होणे (suspension problems)
जर कारच्या सस्पेंशनमध्ये एकदा खराब झाले की गाडी चालवताना स्टेअरींमध्ये वायब्रेशन जाणवते. जर योग्य वेळी ही समस्या दूर केली नाही कर भविष्यात गाडीशी संबंधित अनेक समस्या वाढतात ज्याला नीट करायला वेळ आणि पैसा दोन्ही खर्च होतो. कारचं सस्पेंशन खराब झाल्यास, गाडी चालवताना धक्के जाणवतात किंवा आवाज येतो.
गाडीची नीट काळजी न घेणे (No car care)
जर तुम्ही गाडी चालवताना नीट काळजी घेत नाही आण दीर्घ काळ गाडी खराब रस्ते, ड्रायव्हिंग पॅटर्नसह चालवत असाल स्टेअरींगमध्ये वायब्रेशन होण्याचा धोका वाढतो. काही वेळा वातारवणात बदल झाल्यामुळे देखील स्टेअरींग वायब्रेट करते.
ब्रेक रोटर खराब होणे (Brake rotor problem)
जर तुमच्या कारचे ब्रेक रोटर खराब झाले असेल तर कार चालवताना स्टेअरिंगमध्ये वायब्रेशन होते. सहसा हे तेव्हा होतं जेव्हा गाडीमध्ये ब्रेक लावले जातात. ब्रेक रोटर आणि ब्रेक पॅड मिळून कारची स्पीड कमी केली जाते. हे खराब झाले तर स्टेअरिंगमध्ये वायब्रेशन जाणवते.
या वरील कारणांमुळे स्टेअरिंगमध्ये वायब्रेशन होते. त्यासाठी कारची आवश्यक काळजी घेणे गरजेचे आहे आणि वरील समस्या निर्माण होऊ नये, याविषयी सतर्क राहणे गरजेचे आहे.