Winter bike starting problem solution : हिवाळा ऋतूला सुरुवात झाली असून, महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी थंडीचा जोर वाढत आहे. हिवाळ्यात बोचऱ्या थंडीत तुमची जशी अवस्था असते, तशीच अवस्था तुमच्या बाईकचीदेखील होते. तुम्हाला या दिवसांत जशी त्वचेची काळजी घ्यावी लागते, त्याचप्रमाणे बाईकची काळजी घेणेदेखील आवश्यक असते. कारण- या दिवसांत तापमान कमी झाल्याने बाईक पटकन सुरू करणे फार कठीण होऊन बसते. हिवाळ्यात कित्येकदा वारंवार किक मारूनही बाईक सुरू होत नाही. जर तुम्हालाही अशा समस्या जाणवत असेल तर तुम्ही खालील काही सोप्या टिप्सचा वापर करू शकता. ज्याच्या मदतीने कडाक्याच्या थंडीतही तुमची बाईक एक कीक देताच झटक्यात सुरु होईल.
स्पार्क प्लग तपासा
बाईकच्या इंजिनच्या वरच्या बाजूला पांढऱ्या रंगाचा स्पार्क प्लग दिलेला असतो, ती वायर कधी कधी सैल होते. त्यामुळे ती इंजिनला पूर्णपणे साथ (कनेक्शन) देऊ शकत नाही. त्यामुळे बाईक सुरू व्हायला वेळ लागतो. जर बाईक सुरू होत नसेल, तर स्पार्क प्लग काढा आणि एका कपड्याने स्वच्छ करा व पुन्हा नीट फिट करा. त्यानंतर बाइक सुरू करण्याचा प्रयत्न करा.
इंजिन कट ऑफ स्विच
अनेक वेळा लोक बाईक थांबवण्यासाठी इंजिन स्विचचा वापर करतात. त्यामुळे कधी कधी बाईक पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला तरी ती सुरू होत नाही. वारंवार किक मारल्यानंतर किंवा सेल्फ-स्टार्ट करूनही बाईक सुरू होत नसेल, तर बाजूला दाखविलेला लाल रंगाचा इंजिन स्विच आवर्जून तपासा.
“जपले असते तर…” ‘ट्रकच्या मागे मालकानं लिहिला भावनिक मेसेज; वाचून तुम्हाला कळेल नात्यांची किंमत
बॅटरी संपणे
थंडीत बहुतेकांना या समस्येचा सामना करावा लागतो. त्याशिवाय अनेक दिवसांनी बाईक सुरू करताना बाईकचा सेल्फ काम करीत नसेल, तर त्याची बॅटरी संपली आहे, असे समजा. यावेळी तुमची बाईक मुख्य स्टॅण्डवर ठेवून चौथ्या गिअरमध्ये टाका आणि मागील चाक वेगाने फिरवा. त्यानंतर तुमची बाईक सुरू होण्याची शक्यता आहे.
कोणतेही इंधन नसणे किंवा एअर फिल्टर जाम होणे
अनेक वेळा बाईकमधील इंधन वा पेट्रोल संपते; पण ते आपल्या लक्षात येत नाही. अशा स्थितीत बाईक सुरू करणे अशक्य होते. त्याशिवाय बाईक सुरू करताना जर ती ट्रान्समिशन गिअरमध्ये असेल तर तुम्हाला क्लच लीव्हर व्यवस्थित खेचावे लागते. काहीवेळा, क्लच योग्यरित्या गुंतत नाही ज्यामुळे सुरू होण्यात समस्या निर्माण होतात. अशा स्थितीत, बाईकचा गियर न्यूट्रल करा आणि पुन्हा प्रयत्न करा.
बाईक थांबण्याआधीच चालवताना झटका जाणवला, तर फिल्टरमध्ये घाण साचली आहे हे समजून जा. यासाठी तुम्हाला एअर फिल्टर साफ करावे लागेल.