अनेकांसाठी आपल्या वाहनांचा नोंदणी क्रमांक हा फार जिव्हाळ्याचा विषय असतो. अनेकजण अंकशास्त्रावर आधारित क्रमांकासाठी पैसे मोजतात तर काहीजण विशेष क्रमांकच आपल्या गाडीच्या नंबर प्लेटवर असावे म्हणून पैसे मोजताना दिसतात. अनेकदा अशा विशेष सिरीजचे क्रमांक स्थानिक परिवहन कार्यालयाकडून लिलावासाठी उपलब्ध करुन दिले जातात. अनेकदा केवळ क्रमांक विकत घेण्यासाठी हजारो रुपयांपासून ते अगदी ३० लाखांपर्यंत खर्च केलेल्यांच्या बातम्या आतापर्यंत वाचनात किंवा ऐकण्यात आल्या असते. मात्र नंबर प्लेट्ससंदर्भातील हे वेड केवळ भारतातच नाहीय तर जगभरामध्ये दिसून येतं. हे वेड इतकं आहे की युनायटेड किंग्डममधील एका व्यक्तीने त्यांच्या गाडीसाठी खास क्रमांकाची नंबर प्लेट मिळावी म्हणून तब्बल १३२ कोटी रुपये खर्च केले आहेत. १३२ कोटींचा हा विशेष क्रमांक आहे F1.

नक्की वाचा >> …अन् नितीन गडकरींनाही आवरला नाही ‘टेस्ट ड्राइव्ह’चा मोह; गडकरींना भावलेल्या या दुचाकीची वैशिष्ट्यं, किंमत जाणून घ्या

युनायटेड किंग्डममध्ये एफ वन या नंबर प्लेटबद्दल वाहनमालकांना प्रचंड आकर्षण आहे. अनेकदा ही नंबर फ्लेट महागड्या गाड्यांवर दिसून येते. यामध्ये मर्सिडीज-मॅक्लरेन एसएलआर, बुगाटी व्हिरॉन यासारख्या गाड्यांचा समावेश होतो. एफ वन हा क्रमांक फॉर्म्युला वन या कार शर्यतीशी संबंध आहे. कार आणि त्यातही वेगाचं वेड असणाऱ्यांना एफ वनचा वेगळा अर्थ सांगण्याची गरज नाही. जगातील सर्वात लोकप्रिय वाहन शर्यतींमध्ये एफ वन अव्वल स्थानी आहे. हा क्रमांक सर्वात महाग असण्यामागील कारण म्हणजे युनायटेड किंग्डममधील सर्वात लहान सिरीजमधील आणि विशेष क्रमांकांमध्ये हा क्रमांक सर्वाधिक मागणी असणारा आहे. हा जगातील सर्वात लहान नंबर प्लेट्समध्ये अव्वल स्थानी असल्यानेच त्याची किंमत एवढी आहे.

एफ वन ही नंबर प्लेट १९०४ पासून अ‍ॅसेक्स शहर प्रशासनाच्या मालकीची होती. २००८ साली या क्रमांकाचा सर्वात पहिल्यांदा लिलाव करण्यात आला. हा क्रमांक सध्या युनायटेड किंग्डममधील अफझळ खान यांच्या काहन डिझाइन्सच्या मालकीचा आहे. हा क्रमांक त्यांनी त्यांच्या बुगाटी व्हिरॉनसाठी घेतला आहे. या क्रमांकासाठी त्यांनी १३२ कोटी रुपये मोजले आहेत. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर हा क्रमांक या गाडीपेक्षा फार महाग आहे. अर्थात ही गाडीही प्रचंड महाग असून जगातील आलीशान गाड्यांमध्ये तिचा समावेश होतो. असं असलं तरीही १३२ कोटी रुपये ही या गाडीच्या किंमतीसमोर फार मोठी रक्कम आहे.

(फोटो फेसबुकवरुन साभार)

या क्रमांकाच्या लिलावाबद्दल सांगायचं झाल्यास सर्वात आधी हा क्रमांक चार कोटींना विकला गेले होता. मात्र नंतर या क्रमांकाची मागणी वाढल्याने त्यांच्या किंमतही वाढ झाली. सध्या हा वाहन जगतामधील सर्वात महागड्या क्रमांकांमध्ये अव्वल स्थानी आहे. मात्र अशाप्रकारे अनपेक्षित रक्कम मोजून नंबर विकत घेणारे खान हे काही पहिले व्यक्ती नाही. यापूर्वी आबूधाबीमध्ये एका भारतीय उद्योजकाने डी फाइव्ह (D5) हा क्रमांक ६७ कोटींना विकत घेतला होता. तर याच शहरामध्ये अन्य एका व्यक्तीने ‘वन’ क्रमांक ६६ कोटींना विकत घेतलेला.

Story img Loader