World Record for Most Expensive Number Plate: तुम्ही अनेक आलिशान गाड्यांबद्दल ऐकले असेल, ज्यांच्या किमती करोडोंमध्ये आहेत. पण, तुम्ही अशा व्हीआयपी कारचा नंबर कधीच ऐकला नसेल, ज्याची किंमत करोडोंमध्ये असेल. होय, आम्ही VIP कार नंबर प्लेट ‘P 7’ बद्दल बोलत आहोत, ज्याने ‘मोस्ट नोबल नंबर्स’ चॅरिटी लिलावात विक्रमी ५५ दशलक्ष दिरहम (अंदाजे ₹१२२.६ कोटी) मिळवले. जगातील सर्वात महागड्या नंबर प्लेटचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे. नंबर प्लेटचा खरेदीदार कोण आहे. या व्यक्तीची माहिती अद्याप मिळालेली नाही.

रकमेचा उपयोग ‘या’ कामासाठी केला जाणार

या लिलावातील सर्व पैसे ‘वन बिलियन मील्स’ मोहिमेसाठी सुपूर्द केले जातील, ज्याची स्थापना जागतिक उपासमारीचा सामना करण्याच्या उद्देशाने करण्यात आली होती. या मोहिमेचे उद्दिष्ट रमजानसाठी अन्न निधी उभारणे आहे. हा लिलाव एमिरेट्स ऑक्शन्सने मोहम्मद बिन रशीद अल मकतूम ग्लोबल इनिशिएटिव्हजच्या योगदानाने आयोजित केला होता.

Suraj Chavan KGF Bike
“ही गाडी म्हणजे माझी लक्ष्मी…”, सूरज चव्हाणकडे आहे खास KGF Bike! कोणी दिलीये भेट? म्हणाला…
15 November Mesh To Meen Horoscope
१५ नोव्हेंबर पंचांग: कार्तिक पौर्णिमेला कोणाला होईल धनप्राप्ती?…
ajay devgan
“तो कारमध्ये एक हॉकी स्टिक…”, रोहित शेट्टीने अजय देवगणबाबत केला खुलासा; अभिनेता म्हणाला, “आता मी…”
A bull attacked a scooter driver who came under the truck viral video on social media
बैलाने मारली उडी अन् स्कूटर चालक गेला ट्रकच्या खाली, पुढे नेमकं काय घडलं? पाहा धक्कादायक VIDEO
Gold Silver Price Today 10th November 2024 in Marathi
Gold-Silver Price: ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीपूर्वी जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
petrol diesel price today in marathi
Price of Petrol And Diesel : पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? तुमच्या शहरातील आजचे दर येथे चेक करा
Terrifying Railway accident of railway employee due to train driver at barauni junction in bihar video viral
बापरे! चालकाच्या चुकीमुळे घडला मोठा अनर्थ, ट्रेन सुरू करताच झाला रेल्वे कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू, नेमकं काय घडल? पाहा VIDEO
pm modi said ek hai toh safe
योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’नंतर पंतप्रधान मोदींकडून ‘एक हैं तो सेफ है’चा नारा

लिलावात अनेक नंबर प्लेट्सचा समावेश

या लिलावाचा भाग AA19, AA22, AA80, O71, X36, W78, H31, Z37, J57 आणि N41 सारख्या १० दोन-अंकी क्रमांकांसह अनेक नंबर प्लेट्स होत्या. इतर विशेष नंबर प्लेट्समध्ये Y900, Q22222 आणि Y6666 समाविष्ट आहेत. AA19 ४.९ दशलक्ष दिरहमांना विकला गेला, तर O71 150 दशलक्ष दिरहम आणि Q22222 ९७५,००० दिरहममध्ये लिलाव झाला.

(हे ही वाचा : फक्त ५.२५ लाख रुपये किंमत अन् 26Km चे मायलेज; मारुतीच्या ‘या’ ७ सीटर कारनं Tata Punch ला पछाडलं )

‘P 7’ क्रमांकावर बोली

२००८ मध्ये अबू धाबी कार नंबर १ प्लेट ५२.२ दशलक्ष दिरहम (अंदाजे ११६.३ कोटी) मध्ये विकली गेली तेव्हा अनेकांना विक्रम मोडायचा होता म्हणून ‘पी 7’ क्रमांकाने बोली लावली. नंबर प्लेट्सची बोली १५ दशलक्ष दिरहम पासून सुरू झाली, टेलिग्रामचे संस्थापक पावेल दुरोव यांनी देखील बोलीमध्ये भाग घेतला.

मोबाईल क्रमांकांचाही झाला लिलाव

मोस्ट नोबल नंबर्स चॅरिटी लिलाव देखील दुबईमध्ये अनन्य मोबाईल नंबरसाठी झाला आणि एकूण ५३ दशलक्ष दिरहम उभारले. DU चा प्लॅटिनम मोबाईल नंबर (९७१५८३३३३३३३) AED2 मिलियनला विकला गेला.