स्मार्टफोनच्या दुनियेत धूमाकूळ घातल्यानंतर चिनी दिग्गज स्मार्टफोन मेकर कंपनी Xiaomi आता कार क्षेत्रातही उतरली आहे. Xiaomi कंपनीची आता ‘Xiaomi SUV7’ नावाची इलेक्ट्रिक सेडान बाजारपेठेत दाखल झाली आहे. ही एक लक्झरी कार आहे. अलीकडे, SU7 च्या पहिल्या प्रतिमा चीनी सरकारी नियामक एजन्सीद्वारे समोर आल्या. या प्रतिमांमध्ये, SU7 स्पोर्टी आणि स्टाइलिश डिझाइनसह दिसत होती. यात एक लांब आणि सपाट छप्पर, एक धारदार लोखंडी जाळी आणि आकर्षक टेललाइट डिझाइन आहे. ही कार आता चीनमधील स्टोअरमध्ये उपलब्ध आहे.
Xiaomi SU7 कारमध्ये काय आहे खास?
SU7 च्या पुढील भागात बंद लोखंडी जाळी आणि तीक्ष्ण हेडलाइट मॉड्यूल आहेत. हे एक विशिष्ट डिझाइन आहे जे SU7 ला इतर ईव्हीपेक्षा वेगळे करते. कारच्या मागील बाजूस, आयकॉनिक Xiaomi लोगो खालच्या डावीकडे स्थित आहे. याव्यतिरिक्त, आकर्षक सतत टेललाइट्स आहेत जे SU7 चे स्टायलिश स्वरूप पूर्ण करतात. कारची रुंदी १९६३ मिमी आणि लांबी १४५५ आहे. ही कार ३,००० मिमीच्या व्हीलबेससह येते.
(हे ही वाचा : ऑडीची भारतातली ‘ही’ एकमेव कार आहे नीता अंबानींकडे, किंमत ऐकून थक्क व्हाल! )
Xiaomi ची इलेक्ट्रिक कार मस्कच्या टेस्लाला टक्कर देईल असा दावा ऑटो उद्योगात केला जात आहे. Xiaomi SU7 या कारची अंदाजे रेंज ८०० किमी पर्यंत असेल असे सांगण्यात येत आहे. कंपनीने या EV मध्ये ४९५kW ची इलेक्ट्रिक मोटर बसवली आहे. कार लाँचच्या दिवशी कंपनीने सांगितले होते की, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील टॉप ५ ऑटोमोबाईल कंपन्यांमध्ये स्थान मिळवण्याचे आपले लक्ष्य आहे. अमेरिकेतील ईव्ही निर्मात्या टेस्लाचा ऑटो मार्केटमध्ये सर्वाधिक वाटा आहे.
Xiaomi SU7 इलेक्ट्रिक सेडान बद्दल बोलायचे झाले तर त्यात कंपनीची ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे. Aqua Blue, Verdant Green आणि Mineral Grey या ३ कलर व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आली आहे. कार लॉन्चच्या दिवशी कंपनीने याच रंगात काही Xiaomi स्मार्टफोन आणि घड्याळे देखील लाँच केली. इलेक्ट्रिक सेडान सेगमेंटमधील ही कार आहे. या कारच्या किमती बाबत कंपनीने अद्याप खुलासा केलेला नाही.