जगभरातील ऑटो कंपन्यांना आता इलेक्ट्रिक कारवर भर देत आहेत. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमती आणि भविष्याचा विचार केला असता इलेक्ट्रिक गाड्यांच्या मागणीत वाढ होणार आहे. ऑटो कंपन्या एकापाठोपाठ एक नवीन इलेक्ट्रिक गाड्या बाजारात आणत आहेत. मात्र इलेक्ट्रिक कार चार्जिंग सेंटर आणि त्याला लागणार अवधी याबाबत ग्राहकांना प्रश्न पडला आहे. आता चीनच्या एक्सपेंग मोटर्सने (Xpeng Motors) नवी इलेक्ट्रिक कार बाजारात आणली आहे. पाच मिनिटांच्या चार्जिंगमध्ये ही गाडी २०० किलोमीटर अंतर कापते, असा दावा कंपनीने केला आहे. या गाडीचं नाव G9 SUV आहे. ही एक स्मार्ट एसयुव्ही असून कंपनीने या गाडीचं टीझर लॉन्च केलं आहे. एक्सपेंग मोटर्सने ऑटो Guangzhou 2021 इव्हेंट दरम्यान ही गाडी सादर केली आहे. वाहनात सुरक्षिततेसाठी अॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टंट सिस्टम XPILOT 4.0 ADAS देण्यात आली आहे. पर्यावरणाशी संबंधित सर्व मानकांचे पालन करून गाडी तयार करण्यात आले आहे.
एक्सपेंग मोटार्स G9 इलेक्ट्रिक गाडीची वैशिष्ट्ये
गाडीला नेक्स्ट जनरेशन XPower 3.0 पॉवरट्रेन सिस्टीम देण्यात आली आहे. ८०० उच्च व्होल्टेज उत्पादनासह येते. यामध्ये ड्रायव्हर असिस्टंट सिस्टम XPILOT 4.0 ADAS देण्यात आली आहे. ऑटोनॉमस कारसाठी ही एक नवीन प्रणाली आहे. त्यामुळे कार सुरक्षितेत वाढ होते. कारमध्ये स्मार्ट कॉकपिट फीचर देखील देण्यात आले आहे. एसयूव्ही पूर्णपणे आरामदायी आणि प्रशस्त आहे. कारच्या इंटिरिअरबद्दल बोलायचे झाले तर, यामध्ये १० ते १२ इंचाची पूर्णतः फंक्शनल स्टीयरिंग, इन्फोटेनमेंट सिस्टम आहे. इन्फोटेनमेंट कारच्या स्पीडो मीटरशी जोडलेले आहे. त्यामुळे ही डिस्प्ले स्क्रीन खूप मोठी दिसते. ही एक फ्लोटिंग स्क्रीन आहे, ज्यावर डॅशबोर्ड उभारलेला आहे.
गाडी कधी लॉन्च केली जाणार याबाबत कंपनीने अद्याप खुलासा केलेला नाही. गाडी २०२२ पर्यंत बाजारात येण्याची शक्यता आहे. गाडी पाच मिनिटाच्या चार्जिंगमध्ये २०० किलोमीटर अंतर कापत असल्याने कारप्रेमींमध्ये उत्सुकता वाढली आहे. तर पूर्ण चार्जिंगमध्ये गाडी किती किमी धावणार? याचं उत्तर अजूनही गुलदस्त्यात आहे.