जगभरातील ऑटो कंपन्यांना आता इलेक्ट्रिक कारवर भर देत आहेत. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमती आणि भविष्याचा विचार केला असता इलेक्ट्रिक गाड्यांच्या मागणीत वाढ होणार आहे. ऑटो कंपन्या एकापाठोपाठ एक नवीन इलेक्ट्रिक गाड्या बाजारात आणत आहेत. मात्र इलेक्ट्रिक कार चार्जिंग सेंटर आणि त्याला लागणार अवधी याबाबत ग्राहकांना प्रश्न पडला आहे. आता चीनच्या एक्सपेंग मोटर्सने (Xpeng Motors) नवी इलेक्ट्रिक कार बाजारात आणली आहे. पाच मिनिटांच्या चार्जिंगमध्ये ही गाडी २०० किलोमीटर अंतर कापते, असा दावा कंपनीने केला आहे. या गाडीचं नाव G9 SUV आहे. ही एक स्मार्ट एसयुव्ही असून कंपनीने या गाडीचं टीझर लॉन्च केलं आहे. एक्सपेंग मोटर्सने ऑटो Guangzhou 2021 इव्हेंट दरम्यान ही गाडी सादर केली आहे. वाहनात सुरक्षिततेसाठी अॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टंट सिस्टम XPILOT 4.0 ADAS देण्यात आली आहे. पर्यावरणाशी संबंधित सर्व मानकांचे पालन करून गाडी तयार करण्यात आले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा